Nutan Bhise - Lokprant

दिवेघाटातील रस्ता रुंदीकरणासाठी उद्या दुपारी दोन तास वाहतूक पूर्णपणे बंद; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
पुणे:

पुणे-सासवड मार्गावरील दिवेघाट परिसरात रस्ता रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. या कामांतर्गत येत्या बुधवारी (२३ सप्टेंबर २०२६) दिवेघाटात ब्लास्टिंग (स्फोट) करण्यात येणार आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून हडपसर ते दिवेघाट दरम्यानची वाहतूक दुपारी १२:०० ते दुपारी २:०० या दोन तासांच्या कालावधीत सर्व वाहनांसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे.

आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाच्या विस्तारीकरणांतर्गत हे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) हाती घेण्यात आले आहे. ब्लास्टिंगच्या वेळी संभाव्य अपघात टाळण्यासाठी वाहतुकीत हा बदल करण्यात आला आहे.

नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

दुपारी १२ ते २ या वेळेत सासवड, जेजुरी किंवा बारामतीच्या दिशेने जाणाऱ्या तसेच पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांनी या मार्गाचा वापर टाळावा. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून इतर पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले आहे. नागरिकांनी आणि वाहनधारकांनी या काळात प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंतीही करण्यात आलीआहे.

बातमी प्रसिद्ध केल्याचा राग; कुडाळमध्ये पत्रकाराला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी
आनेवाडी सातारा :

पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या बेकायदेशीर भंगार जाळण्याच्या प्रकाराविरोधात आवाज उठवणे एका पत्रकाराला महाग पडले आहे. यासंदर्भातील बातमी आणि व्हिडिओ प्रसारित केल्याचा राग मनात धरून कुडाळ (ता. जावली) येथील पत्रकार प्रसन्न विनायक पवार (वय ३२) यांना अवाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना शनिवारी (२९ ऑगस्ट) दुपारी घडली असून, या प्रकरणी संशयित भंगार व्यावसायिक राधेश्याम मोरया याच्याविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात अदखलपात्र (NC) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

‘प्रसन्ना एक्सप्रेस’वरील बातमीचा राग

मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळ परिसरात उघड्यावर भंगार जाळल्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याचा प्रकार समोर आला होता. या गंभीर समस्येवर प्रकाश टाकणारा व्हिडिओ आणि वृत्त पत्रकार प्रसन्न पवार यांनी दोन दिवसांपूर्वी ‘प्रसन्ना एक्सप्रेस’ या आपल्या यूट्यूब व फेसबुक न्यूज चॅनेलवर प्रसिद्ध केले होते. या बातमीमुळे संबंधित भंगार व्यावसायिक प्रचंड संतप्त झाला होता.

रस्त्यात गाठून धमकी

शनिवारी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास कुडाळ येथील एम.पी. पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावरून जात असताना राधेश्याम मोरया याने पत्रकार पवार यांना अडवले. “तुला व्हिडिओ टाकायला मीच दिसलो का? यापुढे माझा व्हिडिओ टाकलास तर गाठ गाठीशी आहे,” असे म्हणत त्याने पवार यांच्या अंगावर धावून जात बेधडक शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची थेट धमकी दिली.

पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

या अचानक घडलेल्या प्रकारानंतर पत्रकार प्रसन्न पवार यांनी तत्काळ कुडाळ पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली व फिर्याद दिली. पोलिसांनी या घटनेची दखल घेत संशयित राधेश्याम मोरया याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५२, ३५१(२) आणि ३५१(३) अन्वये अदखलपात्र गुन्हा (NCR No. ५८४/२०२६) नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार निकम (बकल क्र. २२१०) करत आहेत.

पत्रकार सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत

सामाजिक आणि पर्यावरणीय समस्येवर परखडपणे प्रकाश झोत टाकणाऱ्या पत्रकाराला अशा प्रकारे धमकावण्याच्या घटनेमुळे जावली तालुक्यातील पत्रकार संघटना आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधींमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. पत्रकारांवर होणारे असे हल्ले आणि धमक्यांचा निषेध करत, पत्रकारांना भयमुक्त वातावरणात काम करता यावे यासाठी पोलिसांनी संबंधित आरोपीवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे

सपोनि. गोसावींच्या नेतृत्वाखाली दहिवडी पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; सात आरोपी जेरबंद
​दहिवडी: माण तालुक्यातील लोधवडे येथे काही दिवसांपूर्वी पडलेल्या ₹२ लाख ६० हजारांच्या दरोड्याचा दहिवडी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावला आहे. या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या सातही संशयित आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ केली आहे. दहिवडी पोलिसांच्या या वेगवान कारवाईमुळे नागरिकांमधून कौतुक होत आहे.

​लोधवडे गावात काही दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून सुमारे ₹२,६०,००० चा मुद्देमाल लंपास केला होता. भरवस्तीत झालेल्या या दरोड्यामुळे लोधवडेसह संपूर्ण माण तालुक्यात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले होते. कोणतीही भक्कम सुगावा नसताना एवढ्या मोठ्या गुन्ह्याचा तपास करण्याचे मोठे आव्हान दहिवडी पोलिसांसमोर होते.

​सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाचे विशेष पथक तयार करण्यात आले.

​गुप्त बातमीदारांचे जाळे सक्रिय करून आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांचा माग काढला. सलग शोधमोहीम राबवून पोलिसांनी या दरोड्यातील सातही संशयितांना जेरबंद केले.

​ सुरुवातीला न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी पहिल्या कोठडीची मुदत संपल्यानंतर सातही आरोपींना पुन्हा दहिवडी न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करणे, तसेच इतर धागेदोरे शोधण्यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली. न्यायालयाने तपासाची गरज लक्षात घेऊन आरोपींना पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी सराईत आहेत का? तसेच त्यांचे इतर जिल्ह्यांत किंवा इतर काही गंभीर गुन्ह्यांमध्ये हात आहेत का? या दृष्टीने पोलीस सध्या सखोल चौकशी करत आहेत.​दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्याचा अल्पावधीत शोध लावून आरोपींच्या मुसक्या आवळल्यामुळे दहिवडी पोलिसांच्या कार्यपद्धतीचे कौतुक होत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, त्यांचे सहकारी अधिकारी व अमलबजावणी कर्मचाऱ्यांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे सर्वसामान्य नागरिकांमधील सुरक्षेची भावना अधिक दृढ झाली आहे. या प्रकरणात पुढील चौकशीत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा इन्स्पेक्टर २२ लाखांच्या लाच प्रकरणात जाळ्यात; एसीबीची मोठी कारवाई!
​पुणे: दारू विक्रीचा परवाना आणि मायक्रो ब्रेव्हरीची फाईल मंजूर करून देण्यासाठी तब्बल २२ लाख रुपयांची लाच मागून तडजोडीअंती ११ लाख रुपये स्वीकारण्याचे निष्पन्न झाल्याने राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाच्या इन्स्पेक्टरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे पुणे महसूल आणि उत्पादन शुल्क विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.

​    शास्त्रीनगर, येरवडा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 'एच झोन'मध्ये कार्यरत असलेले इन्स्पेक्टर जितेंद्र हरिश्चंद्र पाटील (वय ४७, रा. कोथरूड, पुणे; मूळ रा. परभणी) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ३७ वर्षीय लायसन्स कन्सलटंट व्यवसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अधिकृत तक्रार नोंदवली होती.

​तक्रारदाराच्या अशिलाच्या फर्मसाठी 'एफ एल ३' चा परवाना मिळवून देणे आणि त्याच फर्मची 'मायक्रो ब्रेव्हरी'ची फाईल मंजूर करून देण्याच्या कामासाठी इन्स्पेक्टर पाटील यांनी सुरुवातीला अनुक्रमे १२ लाख आणि ८ लाख रुपये, अशी एकूण २० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या संदर्भात तक्रारदाराने १० एप्रिल २०२६ रोजी एसीबीकडे दाद मागितली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने १३ एप्रिल, २१ मे आणि २२ मे २०२६ रोजी पंचांसमक्ष या तक्रारीची सखोल पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान आरोपी इन्स्पेक्टर पाटील यांनी मूळ मागणीत वाढ करून २२ लाख रुपयांची लाच मागितली व तडजोडीअंती ११ लाख रुपये स्वीकारण्यास संमती दर्शविल्याचे निष्पन्न झाले.

​लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतर आज, १० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी येरवडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपी जितेंद्र पाटील यांना ५:१० वाजता अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सतीश वाळके आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.

​दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने कामासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी न घाबरता एसीबीच्या 1064 या टोल-फ्री क्रमांकावर अथवा पुणे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

गोंदवले शाखेत 'प्रधानमंत्री पीक विमा' मार्गदर्शन वर्ग संपन्न; १० ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्जाचे आवाहन
​दहिवडी: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गोंदवले शाखेत 'सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना' (PMFBY) खरीप हंगाम २०२६ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विभागीय विकास अधिकारी श्री. भाऊसाहेब शिंगाडे साहेब, गोंदवले शाखेच्या शाखाप्रमुख सो. मनीषा काळे, क्लार्क श्री. अमित खुस्पे तसेच एफएलसी (FLC) समन्वयक श्री. सागर पवार प्रमुख उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे होणाऱ्या संभाव्य पिकांच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळवण्यासाठी माण तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

​ बैठकीदरम्यान एफएलसी समन्वयक सागर पवार यांनी पीक विमा योजनेच्या तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले. सुधारित नियमांनुसार योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे 'ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी' असणे आणि 'डिजिटल पीक पाहणी' अंतर्गत पिकांची अचूक नोंद करणे बंधनकारक आहे. माण तालुक्यातील खरीप हंगामातील बाजरी, भुईमूग, मूग, मका आणि कांदा यांसारख्या अधिसूचित पिकांसाठी ही योजना लागू असून, किमान ०.१० हेक्टर (१० आर) क्षेत्र असणारे शेतकरी अर्ज करू शकतात. शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी केवळ २ टक्के तर कांद्यासारख्या नगदी पिकासाठी ५ टक्के इतकाच मर्यादित विमा हप्ता भरावा लागणार आहे.

​१० ऑगस्ट अंतिम मुदत:-

या योजनेचा ऑनलाईन पीक विमा अर्ज स्वीकारण्यासाठी शासनाने १० ऑगस्ट ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नसल्याने, तालुक्यातील सर्व कर्जदार व बिगर-कर्जदार शेतकऱ्यांनी वेळेत आपले अर्ज ऑनलाइन पोर्टलवर सादर करावेत, असे स्पष्ट करण्यात आले. गोंदवले शाखेच्या शाखाप्रमुख सो. मनीषा काळे यांनी बँकेमार्फत शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली, तसेच बोगस नोंदणी किंवा फेरफार केल्यास ५ वर्षांची शासकीय बंदी व कायदेशीर कारवाई होऊ शकते या कडक नियमांचीही जाणीव करून दिली.

वृक्षसंवर्धनाचा संदेश देत चंदन शिंदे यांच्याकडून मोफत वृक्षरोपांचे वाटप
खोजेवाडी : पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते चंदन शिंदे यांच्या पुढाकारातून खोजेवाडी परिसरात मोफत वृक्षरोप वाटप उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमात नागरिकांना फळझाडे, सावलीची झाडे तसेच विविध औषधी वनस्पतींची रोपे विनामूल्य देण्यात आली. युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रोपे स्वीकारली. यावेळी चंदन शिंदे यांनी उपस्थितांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून देत प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून ते जगविण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. वाढते प्रदूषण, तापमानवाढ आणि पाण्याची टंचाई यांसारख्या समस्यांवर वृक्षारोपण हा प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी नमूद केले.
"झाडे लावा, झाडे जगवा" आणि "एक माणूस, एक झाड" ही संकल्पना प्रत्येक घरापर्यंत पोहोचली पाहिजे. भावी पिढीसाठी स्वच्छ हवा, समृद्ध पर्यावरण आणि हिरवाई जपणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले.
उपस्थितांनी पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची प्रतिज्ञा घेतली. या उपक्रमामुळे परिसरात पर्यावरणाबाबत जनजागृती होण्यास मदत झाली.

२ कोटींच्या दंडाची भीती दाखवून १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी शिवाजीनगरच्या महिला तलाठ्यासह कोतवालावर गुन्हा दाखल
विशेष वृत्त/पुणे:

इमारतीच्या पाया खोदकामात नियमबाह्य काम झाल्याचे सांगून दोन कोटी रुपयांचा दंड ठोकण्याची भीती दाखवत तब्बल १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या शिवाजीनगर येथील महिला तलाठी आणि कोतवालावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे महसूल वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

आश्विनी दत्तात्रय कोकाटे (वय ३७, पद- तलाठी, शिवाजीनगर तलाठी कार्यालय) आणि महेश मधुकर मुंढे (वय ३०, पद- कोतवाल) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी ३७ वर्षीय खोदकाम कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे तक्रार नोंदवली होती.

काय आहे नेमके प्रकरण?

तक्रारदार कंत्राटदाराच्या फर्ममार्फत सेनापती बापट रोडवरील सर्व्हे नं. ९६७ येथील एका कमर्शियल प्रोजेक्टच्या इमारतीचा पाया खोदण्याचे काम सुरू होते. या खोदकामाचा पंचनामा तलाठी आश्विनी कोकाटे यांनी केला होता. पंचनाम्यात ३२०० ब्रास जास्त खोदकाम दाखवून, 'तुम्हाला २ कोटींचा दंड बसेल' अशी भीती कोकाटे यांनी कंत्राटदाराला दाखवली. हा दंड टाळण्यासाठी आणि तहसिलदारांकडे 'निल' (शून्य) पंचनाम्याचा अहवाल सादर करण्यासाठी त्यांनी कंत्राटदाराकडे १० लाख रुपयांच्या लाचेची थेट मागणी केली.

पडताळणीत लाचेची मागणी सिद्ध

कंत्राटदाराने याबाबत १५ जून २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाद मागितली. तक्रारीच्या अनुषंगाने १६ जून २०२६ रोजी पथकाने केलेल्या पडताळणी कारवाईदरम्यान, तलाठी कोकाटे यांनी १० लाखांची लाच मागितल्याचे आणि ही रक्कम कोतवाल महेश मुंढे याच्याकडे सुपूर्द करण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. तसेच कोतवाल मुंढे यानेही लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवून या गुन्ह्यास प्रोत्साहन दिल्याचे स्पष्ट झाले.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी ४ ऑगस्ट २०२६ रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे कलम ७ आणि १२ अन्वये गुन्हा (गु. रजि. नं. २०५/२०२६) दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे, पोलीस उपअधीक्षक सतिश वाळके व त्यांच्या पथकातील विकास आडके, वैशाली माकर आणि दीपक काकडे यांनी केली.

काही तासांतच मोठा फेरबदल! धर्मेंद्र प्रधान यांच्या एक्झिटनंतर 'हे' निष्ठावंत नेते बनले देशाचे नवे शिक्षण मंत्री
नवी दिल्ली:

केंद्रीय मंत्रिमंडळात एक मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काही तासांतच प्रल्हाद जोशी यांची भारताचे नवे शिक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे प्रल्हाद जोशी आता देशाच्या शिक्षण क्षेत्राची धुरा सांभाळणार आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी आणि नवी जबाबदारी

धर्मेंद्र प्रधान यांच्या अचानक झालेल्या एक्झिटनंतर नव्या शिक्षण मंत्र्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आणि पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाचा विश्वास पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रल्हाद जोशी यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

आरएसएसशी दीर्घकाळापासून जोडलेले प्रल्हाद जोशी यांनी यापूर्वीही अनेक महत्त्वाची केंद्रीय मंत्रालये यशस्वीपणे हाताळली आहेत. आता देशात 'राष्ट्रीय शिक्षण धोरण' (NEP) प्रभावीपणे लागू करणे आणि शिक्षण क्षेत्रातील विविध आव्हानांना सामोरे जाणे, हे त्यांच्यासमोरील मुख्य उद्दिष्ट असणार आहे.

प्रल्हाद जोशी यांचा राजकीय प्रवास

कर्नाटकातील धारवाड मतदारसंघातून लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे प्रल्हाद जोशी हे भाजपचे अत्यंत महत्त्वाचे आणि ज्येष्ठ नेते आहेत. संसदीय कामकाज मंत्रालय आणि कोळसा व खाण मंत्रालय यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांचा कार्यभार त्यांनी यापूर्वी सांभाळला आहे. त्यांची शांत, अभ्यासू आणि कार्यक्षम नेता म्हणून ओळख आहे. संघ परिवाराशी असलेले निकटचे संबंध आणि प्रशासनावरील पकड यामुळेच शिक्षण मंत्रालयासारख्या संवेदनशील विभागासाठी त्यांची निवड करण्यात आल्याचे मानले जात आहे.

जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या संघर्षाला बॉलिवूडचा मोठा पाठिंबा! इम्रान खान, हुमा कुरेशी मैदानावर; सलमान अन् रवीनाचाही पाठिंबा
नवी दिल्ली / मुंबई:

NEET आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील पेपर लीक प्रकरणाचे लोण आता संपूर्ण देशात पसरले आहे. दिल्लीच्या ऐतिहासिक जंतर-मंतर मैदानावर शेकडो विद्यार्थी आणि पालक आपल्या भविष्यासाठी व न्यायासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. आता या विद्यार्थ्यांच्या लढ्याला बॉलिवूडमधील दिग्गज सेलिब्रिटींचा मोठा पाठिंबा मिळताना दिसत असून अनेक कलाकार थेट आंदोलनाच्या मैदानात उतरले आहेत.

आमिर खानचा भाचा इम्रान खान थेट आंदोलनात सहभागी

दीर्घकाळ अभिनय क्षेत्रापासून दूर असलेला प्रसिद्ध अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इम्रान खान (Imran Khan) याने प्रत्यक्ष जंतर-मंतरवर पोहोचून आंदोलनात सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांसोबत बसून त्याने त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि त्यांच्या हक्काच्या लढ्याला पूर्ण पाठिंबा दर्शवला. इम्रान खानच्या या सहभागामुळे आंदोलनातील तरुणांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

रात्रीच्या वेळी जंतर-मंतरवर पोहोचली हुमा कुरेशी

विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी अभिनेत्री हुमा कुरेशी हिनेदेखील थेट दिल्लीतील जंतर-मंतर गाठले. रात्रीच्या वेळी आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचून तिने विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला. "देशातील तरुणांच्या भविष्याशी होत असलेला हा खेळ अत्यंत दुर्दैवी आहे," अशी भावना तिने व्यक्त केली.

सलमान खान आणि रवीना टंडन यांचे रोखठोक ट्विट

सुपरस्टार सलमान खान याने सोशल मीडियावर पोस्ट करत विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाचे कौतुक केले. “पेपर लीक हा अत्यंत गंभीर विषय असून शिक्षण क्षेत्राला राजकीय स्वार्थापासून दूर ठेवले पाहिजे,” असे सलमानने स्पष्ट केले.

तसेच, प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन हिनेदेखील 'X' (ट्विटर) वर पोस्ट शेअर करत विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ थेट आवाज उठवला. “विद्यार्थ्यांची मेहनत आणि त्यांचे भविष्य सुरक्षित राहणे गरजेचे आहे. दोषींवर तातडीने कडक कारवाई झालीच पाहिजे,” असे मत तिने मांडले.

मुंबईतील आंदोलनात अभिनेत्री आयशा खान सहभागी

केवळ दिल्लीतच नाही, तर मुंबईत पार पडलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात अभिनेत्री आयशा खान हिने प्रत्यक्ष उपस्थिती लावली. विद्यार्थ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहत तिने प्रशासनाविरोधात आणि पेपर लीक माफियांविरुद्ध कठोर कायद्याची मागणी केली.

सेलिब्रिटींच्या पाठिंब्यामुळे आंदोलनाला बळ

NEET परीक्षा रद्द करून निष्पक्ष चौकशी व्हावी, या मागणीसाठी देशभरातून आवाज उठवला जात आहे. आता चित्रपट सृष्टीतील आघाडीच्या कलाकारांनी उघडपणे पाठिंबा दर्शवल्यामुळे आणि प्रत्यक्ष मैदानात उतरल्यामुळे या आंदोलनाला अधिक गती आणि बळमिळाले आहे.

पेपर लीक प्रकरणावर PM मोदींची मोठी घोषणा! गुन्हेगारांवर कठोर कारवाईसाठी स्थापन होणार ‘फास्ट ट्रॅक कोर्ट’
नवी दिल्ली:

देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या पेपर लीक प्रकरणांवर केंद्र सरकारने अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी मोठी घोषणा करत, पेपर लीक प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यासाठी ‘फास्ट ट्रॅक कोर्ट’ (Fast-Track Courts) स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे.

"युवांचे भविष्य आणि हित आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे"

पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर (ट्विटर) पोस्ट करत म्हटले की, "देशातील तरुणांचे हित आणि त्यांचे भविष्य आमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे आहे. पेपर लीक प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर आणि कठोर शिक्षा मिळावी, यासाठी खटल्यांच्या जलद निकालासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे."

त्यांनी पुढे नमूद केले की, यासंदर्भात संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांना आवश्यक ती सर्व कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकारकडून घेण्यात येत असलेल्या निर्णयांच्या शृंखलेतील हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.

"तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सोडले जाणार नाही," असा थेट आणि कडक इशाराच पंतप्रधान मोदी यांनी दिला आहे.

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

गेल्या काही काळात देशात विविध स्पर्धा परीक्षा आणि भरती परीक्षांचे पेपर लीक झाल्याच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले होते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. आता थेट पंतप्रधानांनीच या प्रकरणात हस्तक्षेप करत फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचे स्पष्ट केल्यामुळे खटले वर्षानुवर्षे न रखडता आरोपींना तातडीने शिक्षा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोहगाव-डी. वाय. पाटील रस्ता बनला 'मृत्यूचा सापळा'!
लोहगाव : डी. वाय. पाटील कॉलेज ते लोहगाव दरम्यान जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली असून, हा रस्ता आता वाहनधारकांसाठी थेट ‘मृत्यूचा सापळा’ ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच मोठ्या थाटामाटात तयार करण्यात आलेला हा रस्ता पहिल्याच पावसात उघडा पडला असून, संपूर्ण रस्त्यावर भलेमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे प्रशासनाच्या निकृष्ट कामावर आणि कारभारावर स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

रात्रीच्या वेळी अपघातांचा धोका वाढला

सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि मुसळधार पावसात या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जीवावर बेतण्यासारखे झाले आहे. अनेक दुचाकीस्वार खड्ड्यांचा अंदाज न आल्याने घसरून पडत आहेत, तर चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान होत आहे.

नागरिकांचे मुख्य प्रश्न व तक्रारी:

निकृष्ट दर्जाचे काम: अवघ्या काही दिवसांपूर्वी झालेल्या रस्त्याची इतक्या लवकर चाळण कशी झाली? कामाचा दर्जा तपासणार कोण?

प्रशासकीय दुर्लक्ष: अपघातांची वाट प्रशासन पाहतेय का? एखादा मोठा बळी गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का?

आर्थिक नुकसान: खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून, नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

स्थानिक नागरिकांचा इशारा:

"हा रस्ता विद्यार्थ्यांना आणि रोजच्या प्रवाशांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. प्रशासनाने तात्काळ या खड्ड्यांची दुरुस्ती करून रस्ता पूर्ववत करावा. अन्यथा स्थानिकांच्या वतीने प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल."

पनामाचे परराष्ट्र मंत्री ५ दिवसांच्या भारत दौऱ्यावर; व्यापार आणि सागरी सहकार्य वाढवण्यासाठी होणार उच्चस्तरीय बैठका
नवी दिल्ली: पनामाचे परराष्ट्र मंत्री जेवियर एडुआर्डो मार्टिनेज-आचा वास्केज हे भारत आणि पनामा या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी आजपासून (१९ जुलै) पाच दिवसांच्या अधिकृत भारत दौऱ्यावर आले आहेत. नवी दिल्लीत आगमन झाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. भारत आणि पनामा यांच्यातील भागीदारी ही समान मूल्ये, परस्पर हितसंबंध आणि सद्भावनेवर आधारित असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

​असा असेल परराष्ट्र मंत्र्यांचा दौरा:

हा दौरा १९ जुलै ते २३ जुलै या कालावधीत असणार आहे. या पाच दिवसांत उभय देशांमधील व्यापार, वाणिज्य, कनेक्टिव्हिटी आणि राजनैतिक सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाईल. यासाठी परराष्ट्र मंत्री वास्केज हे भारताच्या प्रमुख नेत्यांशी आणि मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.

​सोमवार: नवीन संसद भवनात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्याशी बैठक होईल, ज्यामध्ये दोन्ही देशांमधील व्यापार आणि आर्थिक संबंधांना गती देण्यावर चर्चा केली जाईल.

​मंगळवार: परराष्ट्र मंत्री नवी दिल्लीतील काही अधिकृत कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील.

​बुधवार: केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी महत्त्वाची बैठक होईल. या बैठकीत सागरी सहकार्य (Maritime Cooperation), लॉजिस्टिक्स, बंदरांचा विकास आणि दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यावर मुख्य भर दिला जाईल.

​हा दौरा आटोपून पनामाचे परराष्ट्र मंत्री गुरुवारी मायदेशी रवाना होतील.

​संबंधांना मिळणार नवी गती:

भारत आणि पनामा यांच्यातील संबंध लोकशाही मूल्ये, परस्परांबद्दलचा आदर आणि व्यापार-गुंतवणूक क्षेत्रातील वाढत्या भागीदारीवर टिकून आहेत. या महिन्याच्या सुरुवातीलाच पनामातील भारताचे राजदूत सुमित सेठ यांनी परराष्ट्र मंत्री मार्टिनेज-आचा यांची भेट घेऊन मैत्रीचे प्रतीक म्हणून 'इंडिया-पनामा फ्लॅग पिन' भेट दिली होती. या पार्श्वभूमीवर होत असलेला हा दौरा दोन्ही देशांमधील धोरणात्मक आणि आर्थिक सहकार्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.