दरोडेखोर दिसतायेत, लवकर याल का? पुण्यात थरारनाट्य, कुख्यात गुंडाला पकडला

 वारजे माळवाडीमधील म्हाडा कॉलनी आणि आसपासच्या परिसरात घरफोड्या करण्यासाठी तयारीत आलेल्या कुख्यात टोळीतील सदस्याला थरारकरित्या पकडण्यात वारजे पोलिसांना यश आले आहे. पहाटे २ वाजता वाजता पुण्यातील टाक गँगचे सदस्य चोरीची चार चाकी घेऊन धारदार शस्त्रांसह जबरी दरोडा आणि घरफोड्या करण्याच्या उद्देशाने आलेले होते. यावेळी कॉलनीमधील जाग्या असलेल्या व्यक्तीने त्यांच्या हातातील खतरनाक हत्यारे पाहून तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. यावेळी पथकाने त्याचा थरारक पाठलाग करत मुसक्या आवळल्या.चोरट्याकडून तीन किलो चांदी, कटर, ड्रिल मशीन, हातोडी , स्क्रू ड्राइवर इत्याधी पहार, कात्री, पकड इत्यादी साहित्य जप्त केले आहे . दरम्यान त्याचे साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले असून, पोलिसांची पथके त्यांच्या मागावर आहेत.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

घरफोड्यांकडून तब्बल 12 लाखांचा मुद्देमाल जप्त; आळेफाटा पोलिसांची कामगिरी

Latest News

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software