- Hindi News
- पुणे
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बी.एस्सी ब्लॅाकचेन टेक्नोलॅाजी या पदवी अभ्यासक्रमातील ६० विद्य...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बी.एस्सी ब्लॅाकचेन टेक्नोलॅाजी या पदवी अभ्यासक्रमातील ६० विद्यार्थ्यांना मिळणार (₹९,००० स्टायपेंड)
यावर्षीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये यंदाच्या २०२५-२०२६ शैक्षणिक वर्षापासून बी.एस्सी. ब्लॉकचेन टेक्नोलॉजी पदवी अभ्यासक्रमाची "अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्रॅम" (AEDP) ला सुरूवात झाली आहे. या अंतर्गत विद्यापीठातील बी.एस्सी ब्लॅाकचेन टेक्नोलॅाजी या पदवी अभ्यासक्रमातील ६० विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी ॲप्रेंटिसशिप दिली जाणार असून, त्यांना दरमहा किमान ₹९,००० इतके स्टायपेंड मिळणार आहे.

देशातील तरुणांना उद्योगसक्षम बनवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने राबवलेल्या या उपक्रमामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात सशक्त कारकीर्द घडविण्याची संधी उपलब्ध होणार आहे.AEDP कार्यक्रमाचा मुख्य हेतू म्हणजे विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक शिक्षण न देता त्यांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव मिळवून देणे, त्यांचे व्यावसायिक कौशल्य विकसित करणे आणि रोजगाराच्या संधींमध्ये वाढ घडवून आणणे हा आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना ब्लॉकचेनसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल. त्यांना उद्योगजगतातील समस्या समजून घेता येतील, प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल आणि त्यांनी शिकलेल्या सैद्धांतिक ज्ञानाचा वापर प्रत्यक्ष कामात करता येईल. हे कौशल्य विद्यार्थ्यांना अधिक सक्षम, आत्मविश्वासू आणि उद्योगासाठी तयार बनवेल.
विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि अनुभव मिळावण्यासाठी हा अभ्यासक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे. भविष्यात असेच उद्योगसंपर्क वृद्धिंगत करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.सध्याच्या डिजिटल क्रांतीच्या युगात अशा प्रकारचे कौशल्यविकास कार्यक्रम अत्यंत गरजेचे ठरत आहेत. त्यामुळे AEDP सारख्या उपक्रमांची निवड विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे. असे प्रा.डॅा. सुरेश गोसावी (कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) म्हणाले
या व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासात नव्हे तर उद्योगात काम करताना येणाऱ्या अडचणींचा सामना करण्याची संधी मिळेल. ब्लॉकचेन हे पुढील पाच वर्षांत प्रत्येक क्षेत्रात महत्वपूर्ण तंत्रज्ञान ठरणार आहे. AEDP अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव, टीमवर्क, आत्मविश्वास आणि व्यावसायिकता येणार आहेत. हा उपक्रम त्यांच्यासाठी आणि विद्यापीठासाठी एक निर्णायक पाऊल आहे. असे ”प्रा.डॅा. पराग काळकर(प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणाले.

खबरें और भी हैं
महिला सुरक्षिततेसाठी जगजागृती कार्यक्रमाचे आयोजन
दहिवडी नगरपंचायतीमध्ये नमस्ते दिन साजरा
ओझरखोल येथे एसटी आणि मिनी बसचा भीषण अपघात
