विद्यापीठात अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

पुणे: आपल्या धारदार लेखणीतून असंख्य कथा, कादंबऱ्या, पोवाडा, लावण्या ,वग लिहिणारे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त सावित्रीबाई फुले विद्यापीठात अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठाच्या जयकर ज्ञानस्त्रोत केंद्रातील अभ्यासिकेच्या दालनामध्ये असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस  कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे, व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर,अधिसभा सदस्य प्रा.डॉ.राजेंद्र घोडे,जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राचे  संचालक डॉ. संजय देसले, डॉ.विलास आढाव, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे अध्यासनप्रमुख डॉ. सुनिल भंडगे, सहायक कुलसचिव डॉ. अजय ठुबे, शिवाजी उतेकर  यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विविध कर्मचारी व विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

घरफोड्यांकडून तब्बल 12 लाखांचा मुद्देमाल जप्त; आळेफाटा पोलिसांची कामगिरी

Latest News

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software