घरफोड्यांकडून तब्बल 12 लाखांचा मुद्देमाल जप्त; आळेफाटा पोलिसांची कामगिरी

       पुण्यातील वडगाव आनंद येथे चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. या टोळीला आळेफाटा पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या 5 तासात ताब्यात घेतले आहे.या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद येथे 5 जुलै रोजी मध्यरात्री चेतन चौगुले यांच्या घराच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला व त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे तब्बल 2 लाख 50 हजारांची चोरी केली होती. तसेच त्यांच्या बाजूला राहणाऱ्या प्रशांत चौगुले यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा तोडून त्यांच्या घरातील रोख रक्कमेसोबत भांडी असाएकूण 2 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याची तक्रार चेतन चौगुले व प्रशांत चौगुले यांनी आळेफाटा येथील पोलीस स्टेशन मध्ये केली.

     या प्रकरणात 5 जणांना अटक करण्यात आली आहे.1) आकाश लकड्या भोसले (वय 19 वर्षे) राहुकूम कॉलनी पारधी वस्ती शिरूर, जिल्हा पुणे. 2)संदीप कैलास भालेराव वय 28 वर्षे रा. सुरेगाव (गंगा) ता. नेवासा जि. अहिल्यानगर, 3)सोमनाथ भीमनाथ बामणे वय 37 वर्षे रा. गुणवंतवाडी ता. गुनाट शिरूर जि. पुणे, 4) संदीप बबन धोत्रे वय 37 वर्षे रा. न्हावरा ता. शिरूर जि. पुणे, 5) श्रीमंत जीवालाल चव्हाण वय 52 वर्षे रा. देऊळगाव सिद्धी ता. जि. अहिल्यानगर अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली पिकअप MH 12 WX8208 सोबत चोरी केलेली 1800 ग्रॅम वजनाची चांदीची भांडी असा एकूण 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

     या प्रकरणाचा तपास आळेफाटा पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांनी केला असून यामध्ये पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, अविनाश शिळीमकर, अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण रमेश चोपडे,स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आळेफाटा पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कामगिरीमुळे या आरोपीच्या मुस्क्या आवळण्यात यश आले.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

घरफोड्यांकडून तब्बल 12 लाखांचा मुद्देमाल जप्त; आळेफाटा पोलिसांची कामगिरी

Latest News

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software