बिदाल मध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन 

दहिवडी:  बिदाल मधील श्री संत सावतामाळी नगर तरुण मंडळाच्या वतीने श्री संत सावतामाळी संजीवन समाधी सोहळ्या निमित्त सोमवार (दि.२१ ) ते बुधवार (दि.२३) श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. यात पहाटे ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ८ ते ११ व दुपारी ३ ते ५ ज्ञानेश्वरी वाचन, सायंकाळी ५ ते ६.३० हरिपाठ व रात्री ७ ते ९ किर्तन असा तीन दिवस दैनदिन कार्यक्रम आहे. शिरवलीचे हभप माणिकराव घाडगे महाराज व्यासपीठ चालक असणार आहेत. चिपळुणचे हभप पांचाळ आप्पा महाराज, जाधववाडीच्या हभप मनिषाताई घाडगे महाराज यांच्याकडून ज्ञानदान होणार आहे. बुधवारी (दि.२३) सकाळी १० वाजता शिरवलीचे हभप माणिकराव घाडगे महाराज यांचे फुलाचे व काल्याचे किर्तन होणार आहे. कार्यक्रम स्थळी तीनही दिवस अल्पोहार व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील भजनी मंडळाचे ही विशेष सहकार्य राहिल. कार्यक्रमासाठी निंबाळकर वस्ती, चिरमे मळा, टेक वस्ती, अडसूळ वस्ती, खारवटी येथील भाविक उपस्थित राहणार आहेत. श्री संत सावतामाळी नगर तरुण मंडळ यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.
Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

घरफोड्यांकडून तब्बल 12 लाखांचा मुद्देमाल जप्त; आळेफाटा पोलिसांची कामगिरी

Latest News

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software