- Hindi News
- सातारा
- दहिवडी नगरपंचायतीमध्ये नमस्ते दिन साजरा
दहिवडी नगरपंचायतीमध्ये नमस्ते दिन साजरा

दहिवडी: स्वच्छ भारत नागरी अभियान २.० अंतर्गत नेशनल एक्शन फॉर मैकेनाइज्ड सैनिटेशन इकोसिस्टम योजनेच्या अनुषंगाने १६ जुलै नमस्ते दिन साजरा करण्यात आला.या दिनानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांची सुरक्षा व प्रतिष्ठा सुनिश्चित करण्यात आली.दहिवडी नगरपंचायतीमध्ये मा. नगराध्यक्षा सौ.निलम जाधव, मा. आरोग्य -सभापती महेश जाधव व मा. मुख्याधिकारी संदिप घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी नमस्ते दिन साजरा करण्यात आला. नगरपंचायतीचे आरोग्य विभाग प्रमुख विजय पाटील यांच्याद्वारे सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या उपकरणांचे महत्त्व सांगण्यात आले.ड्रेनेज सेप्टिक टॅंकची स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्याची काळजी आणि त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये सर्व सफाई कर्मचाऱ्यांना PPE kit देण्यात आले.यावेळी दहिवडीचे नगराध्यक्षा सौ. नीलिमा अतुल जाधव, महेशराव जाधव, संदीप घार्गे व सर्व नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते.

खबरें और भी हैं
महिला सुरक्षिततेसाठी जगजागृती कार्यक्रमाचे आयोजन
दहिवडी नगरपंचायतीमध्ये नमस्ते दिन साजरा
ओझरखोल येथे एसटी आणि मिनी बसचा भीषण अपघात
