स्वच्छ सर्वेक्षण -२०२४ अंतर्गत दहिवडी नगरपंचातीचा डंका राज्यात नववा क्रमांक; कामगिरीत सातत्य

दहिवडी: स्वच्छ सर्वेक्षण - २०२४ अंतर्गत दहिवडी नगरपंचातीने पुन्हा एकदा उत्तम कामगिरी केली आहे. राज्यात नववा क्रमांक मिवळत आपल्या कामगिरीचा डंका वाजवला असून कामगिरीत सातत्य राखले आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण - २०२४ अंतर्गत दहिवडी नगरपंचायतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपला सहभाग नोंदवला होता. स्वच्छ सर्वेक्षण - २०२४ अंतर्गत दहिवडी शहराचा २० हजार पेक्षा कमी लोकसंख्या गटात समावेश आहे. या गटात दहिवडीला देशात २०३५ शहरांमध्ये ८५ वा क्रमांक व राज्यातील १६३ शहरांमध्ये ९ वा क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच दहिवडी शहराला ODF++ व १ स्टार कचरा मुक्त शहर(GFC) मानांकन प्राप्त झाले आहे.
        या कामगिरीबद्दल दहिवडी शहरातील सर्व नागरिकांचे, सर्व पत्रकार बांधवांचे, सर्व सभापतींचे, सर्व सदस्यांचे, मुख्याधिकारी व त्यांचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे नगराध्यक्षा निलम अतुल जाधव यांनी अभिनंदन केले आहे व यापुढेही कामगिरी मध्ये सातत्य राखण्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

घरफोड्यांकडून तब्बल 12 लाखांचा मुद्देमाल जप्त; आळेफाटा पोलिसांची कामगिरी

Latest News

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software