निखिल पिंगळे - Lokprant

फलटणमध्ये पोलिसांचा कडक पवित्रा; १० जणांवर हद्दपारीची कारवाई
सातारा : फलटण शहर आणि परिसरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या १० जणांच्या टोळीवर सातारा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अंतर्गत या टोळीतील सर्व १० जणांना सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे फलटण परिसरातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या टोळी विरोधात चोरी, जबरी चोरी, खंडणी मागणे, मारहाण करून दुखापत करणे तसेच बेकायदा अग्निशस्त्र बाळगणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वीही या आरोपींवर अटक आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरू राहिल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

हद्दपार करण्यात आलेले १० जण

तुषार ऊर्फ गद्या संजय ननवरे

साहिल रवि तारे

वैभव बाळासो सस्ते

रोहन ऊर्फ यल्या नविन काकडे

विनायक बाळासो जाधव

राज ऊर्फ राजु राम बोके

विजय दत्तु ननवरे

गायत्री ऊर्फ प्राची नितीन गाडे

सागर ऊर्फ टक्या मोहन साळुंखे

राहुल रामचंद्र जगताप

या वाढत्या गुन्हेगारी कारवायांच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलीस ठाण्याच्या तत्कालीन प्रभारी अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अंतर्गत हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्या मार्फत प्रस्तावाची सखोल चौकशी करण्यात आली.

या प्रकरणाची सुनावणी हद्दपार प्राधिकरण तथा सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्यासमोर झाली. सुनावणी दरम्यान पोलिसांनी सादर केलेले पुरावे आणि कागदपत्रे विचारात घेतल्यानंतर संबंधित १० जणांना सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले. या आदेशानुसार संबंधित आरोपींना संपूर्ण सातारा जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर आणि पुरंदर तालुके तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका या हद्दीतून बाहेर ठेवण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी सराईत आणि वारंवार गुन्हे करणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. गरजेनुसार हद्दपारी सोबतच मोक्का आणि एमपीडीए यांसारख्या कठोर कायदेशीर तरतुदींचाही वापर केला जाणार असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले. या कारवाईमुळे फलटण परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून, गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलिसांची भूमिका अधिक कठोर झाल्याचे दिसून येत आहे.

१५ वर्षांनंतर हरवलेला तरुण सुखरूप घरी परतला; उंब्रज परिसरात आनंदाचे वातावरण
कराड: आयुष्याच्या एका कठीण वळणावर, कौटुंबिक तणावामुळे घर सोडून गेलेला तरुण तब्बल १५ वर्षांनंतर सुखरूप आपल्या घरी परतल्याची अत्यंत भावूक घटना सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात घडली आहे. १३ जानेवारी २०११ रोजी आईच्या निधनानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत घर सोडणारा रोहन कृष्ण थोरात (वय ३०, रा. कोटी, ता. कराड) हा तरुण १० ऑगस्ट २०२६ रोजी अचानक आपल्या घरी परतला. तब्बल दीड दशकानंतर मुलगा परतल्याने त्याच्या वडिलांसह सर्व नातेवाईकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. याप्रकरणी नातेवाईकांनी रोहनला सोबत घेऊन उंब्रज पोलीस ठाण्यात हजर होत पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

१३ जानेवारी २०११ रोजी रोहन कृष्ण थोरात हा वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी राहत्या घरातून निघून गेला होता. त्यानंतर त्याचा कुठेही पत्ता लागला नव्हता. याप्रकरणी कुटुंबीयांनी तातडीने पावले उचलत उंब्रज पोलीस ठाण्यात मिसिंग रजिस्टर नंबर ०३/२०११ अन्वये हरवल्याची अधिकृत नोंद केली होती. घटनेनंतर पोलिसांकडून आणि नातेवाईका कडून त्याचा कसून शोध घेण्यात आला, मात्र बरीच वर्षे उलटूनही रोहनचा सुगावा लागला नव्हता. अखेर, १५ वर्षांचा मोठा काळ लोटल्यानंतर रोहन १० ऑगस्ट २०२६ रोजी स्वतःहून घरी परतला.

रोहन घरी परतल्यानंतर त्याचे कुटुंबीय त्याला घेऊन त्वरित उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलिसांनी नियमानुसार व कायदेशीर प्रक्रियेनुसार रोहन कृष्ण थोरात याची सखोल चौकशी केली. या चौकशीत सदर व्यक्ती हीच २०११ मध्ये हरवलेली रोहन थोरात असल्याचे पूर्णपणे निष्पन्न झाले. तब्बल १५ वर्षांनंतर आपला लाडका मुलगा सुरक्षितपणे परतल्याचे पाहून त्याचे वडील आणि नातेवाईक अक्षरशः भावुक झाले. या कठीण काळात पोलिसांनी दाखवलेले सहकार्य आणि नोंदवलेली नोंद यामुळेच हा सुखद प्रसंग अनुभवता आल्याची भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली.

सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि कराडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यात हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी विशेष ‘मिसिंग शोध मोहीम’ प्रभावीपणे राबवली जात आहे. या धडाकेबाज मोहिमेमुळे अनेक वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तींचा शोध लागून विखुरलेली कुटुंबे पुन्हा एकत्र येत आहेत. उंब्रज पोलिसांच्या या संवेदनशील भूमिकेमुळे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पोलीस प्रशासनाप्रती नागरिकांमधून कृतज्ञता व्यक्त होत आहे.

महिलांच्या गळ्यातील दागिने लुटणारा सराईत अटकेत; ७ गुन्हे उघडकीस
सातारा: सातारा शहरात आणि लगतच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने ओरबाडून नेणाऱ्या एका सराईत चोरट्याला सातारा शहर डी.बी. पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईमुळे सातारा शहर, शाहूपुरी आणि सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीतील एकूण ७ गंभीर गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी आरोपीकडून तब्बल १२ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल यशस्वीपणे हस्तगत केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील महिन्यात (दि. १६ जुलै २०२६ रोजी) रात्री साडे अकराच्या सुमारास सातारा शहरातील सिद्धिविनायक मंगल कार्यालय ते अश्विनी पार्क संगमनगर, प्रतापसिंहनगर परिसरातील रस्त्यावरून एक महिला पायी चालत जात होती. यादरम्यान, मोटार सायकलवरून आलेल्या एका अज्ञात इसमाने त्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचा दागिने जबरदस्तीने हिसकावून लांब पळ काढला. या प्रकरणी पीडित महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंद करून तपासाची चक्रे फिरवली.

सदर घटनेची गांभीर्य लक्षात घेता, सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सचिन म्हेत्रे यांनी शहर डी.बी. पथकाला या गुन्हेगाराचा कसून शोध घेण्याचे आदेश दिले होते.

सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे लावला छडा:

घटना स्थळाजवळील परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली असता, सातारा शहर, शाहूपुरी आणि सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारे चेन स्नॅचिंगचे एकूण ७ गुन्हे घडल्याचे समोर आले. सर्व गुन्ह्यांमधील संशयित आरोपी एकच असून तो पुणे-सातारा हायवे वरून येऊन चोरी करून पुन्हा त्याच दिशेने पसार होत असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार सातारा शहर डी.बी. पथकाने आनेवाडी आणि पाचवड परिसरात सापळा रचून, दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी संशयित आरोपीला जेरबंद केले. सुरुवातीला पोलिसांच्या चौकशीत तो टाळाटाळ करत होता आणि उडवा उडवीची उत्तरे देत होता; मात्र डी.बी. पथकाने कौशल्यपूर्ण व सखोल चौकशी केल्याने त्याने सात वेगवेगळ्या ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली.

उघडकीस आलेले गुन्हे:

आरोपीने खालीलप्रमाणे सात गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे: १. सातारा शहर पोलीस ठाणे: गु.र.नं. ५८५/२०२६, बीएनएस ३०४(२) – सोन्याचे मनी मंगळसूत्र

२. सातारा शहर पोलीस ठाणे: गु.र.नं. ५९९/२०२६, बीएनएस ३०४(२) – सोन्याचे मनी मंगळसूत्र

३. सातारा शहर पोलीस ठाणे: गु.र.नं. ६०१/२०२६, बीएनएस ३०४(२) – सोन्याचे मनी मंगळसूत्र

४. सातारा शहर पोलीस ठाणे: गु.र.नं. ६१६/२०२६, बीएनएस ३०४(२) – सोन्याचे मनी मंगळसूत्र

५. सातारा तालुका पोलीस ठाणे: गु.र.नं. ३०९/२०२६, बीएनएस ३०४(२) – सोन्याचे मनी मंगळसूत्र

६. शाहूपुरी पोलीस ठाणे: गु.र.नं. २१२/२०२६, बीएनएस ३०४(२) – सोन्याचे मनी मंगळसूत्र

७. शाहूपुरी पोलीस ठाणे: गु.र.नं. २२०/२०२६, बीएनएस ३०४(२) – सोन्याचे मनी मंगळसूत्र

पोलिसांची धडाकेबाज कामगिरी:

पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विपुल पाटील, सातारा शहरचे पोलीस निरीक्षक श्री. सचिन म्हेत्रे आणि शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक श्री. संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर डी.बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, अशोक सावंजी तसेच सातारा शहर, शाहूपुरी आणि सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने ही महत्त्वाची कामगिरी फत्ते केली आहे. सराईत गुन्हेगाराच्या अटके मुळे सातारा शहरातील महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असला, तरी पोलिसांच्या या जलद तपासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रहिमतपूर पोलिसांची मोठी कामगिरी; ८ लाख ७५ हजारांचे ३२ हरवलेले मोबाईल नागरिकांना परत
सातारा: रहिमतपूर पोलिसांनी तंत्रज्ञानाची जोड आणि चिकाटीच्या तपासाच्या  बळावर नागरिकांचे हरवलेले तब्बल ३२ मोबाईल फोन शोधून त्यांचे मूळ मालकांना परत केले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत ८ लाख ७५ हजार रुपये असून, पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले.

मोबाईल हरवल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याने रहिमतपूर पोलिसांनी गुन्हे प्रकटी करण पथकाच्या माध्यमातून विशेष मोहीम हाती घेतली. सीईआयआर (CEIR) पोर्टल आणि आधुनिक तांत्रिक साधनांचा वापर करून महाराष्ट्रासह इतर राज्यांत हस्तांतरित झालेले मोबाईल शोधण्यात आले. त्यानंतर संबंधित व्यक्तींशी संपर्क साधून सर्व मोबाईल जप्त करण्यात आले आणि आवश्यक पडताळणीनंतर मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले.

हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी रहिमतपूर पोलीस ठाणे आणि सातारा जिल्हा पोलिसांचे आभार मानले. तसेच, मोबाईल हरवल्यास त्वरित पोलिसांकडे तक्रार नोंदविण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तरोणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली. या मोहिमेत पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रविण वर्धी तसेच पोलीस कर्मचारी नुपूर कारके, अमर चव्हाण आणि अमर भोसले यांनी सहभाग घेतला.

चिरमुर्यांच्या पोत्यांआड लपवून गुटख्याची वाहतूक; साताऱ्यात २५.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त
सातारा: महाराष्ट्र राज्यात विक्री व वाहतुकीस सक्त बंदी असलेला प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला एका ट्रकच्या माध्यमातून  सांगली बाजुकडून पुणे कडे तस्करी करणाऱ्या टोळीवर सातारा स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. नागठाणे (ता. सातारा) येथे सापळा रचून पोलिसांनी चिरमुरेच्या पोत्यांच्या आड लपवून नेण्यात येणारा तब्बल १७ लाख ६५ हजार ९४० रुपयांचा गुटखा आणि ७ लाखांचे वाहन असा एकूण २५ लाख १५ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, सांगलीकडून पुण्याकडे जाणाऱ्या एका मालट्रकमध्ये (क्र. MH 10/Z 4696) बंदी असलेला गुटखा मोठ्या चलाखीने वाहतूक केला जात असल्याची माहिती सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे यांच्या पथकाने ३ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास नागठाणे येथील हायवे ब्रीजजवळ सापळा रचून संबंधित संशयित ट्रक ताब्यात घेतला.

ट्रकची झडती घेतली असता, सुरुवातीला वरच्या बाजूला चिरमुरेची पोती रचण्यात आली होती. मात्र, त्या पोत्यांच्या आड अतिशय चलाखीने विमल पानमसाला आणि तंबाखूचे साठे लपवून ठेवल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी तात्काळ अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती रुपाली आप्पासाहेब खापणे यांना बोलावून घेत त्यांच्या उपस्थितीत संपूर्ण माल जप्त केला.

याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात अन्न व सुरक्षा मानदे कायदा २००६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सपोनि रोहित फार्णे, प्रशांत हुले आणि त्यांच्या पथकातील अधिकाऱ्यांनी व अंमलदारांनी ही धडाकेबाज कामगिरी पार पाडली आहे. अवैध धंद्यांवर सातारा पोलिसांच्या या कारवाईमुळे तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.