Politics News - Lokprant

रावसाहेब दानवेंचा संजय राऊतांवर खोचक वार; 'एक दिवसाचा मुख्यमंत्री'चा उल्लेख
जालना: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी नुकतीच ‘लापता गृहमंत्री’ या शीर्षकाचा चित्रपट काढण्याची खोचक टीका केली होती. या टीकेला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी अत्यंत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांना टीव्ही चॅनेल आणि वृत्तपत्रांमध्ये सतत झळकायची सवय असल्यामुळेच ते अशा प्रकारची प्रसिद्धी मिळवण्यासाठी विधाने करत असतात, असा टोला दानवे यांनी लगावला. तसेच, संजय राऊत यांनी अमित शाह यांच्यावर चित्रपट काढण्यापेक्षा महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळावर ‘एक दिवसाचा मुख्यमंत्री’ या नावाचा चित्रपट काढावा आणि त्याचे दिग्दर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवावे, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

जालन्यात माध्यमांशी संवाद साधताना रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या लोकप्रियतेबद्दल बोलण्यासारखे काही उरलेले नाही. आजची परिस्थिती अशी आहे की, लोकांमध्ये यांच्यासोबत फिरणे किंवा राहणे म्हणजे स्वतःचा अपमान झाल्यासारखे वाटू लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता ही अफाट असून, ती कमी किंवा जास्त करणे हे संजय राऊत यांच्या हातात नाही, असेही दानवे यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले.

लोकसभेच्या अधिवेशनाबाबत बोलताना दानवे म्हणाले की, संसदेचे अधिवेशन हे जनतेचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी आणि समस्या मांडण्यासाठी असते. मात्र, विरोधकांनी या अधिवेशनात सात दिवसांत एकदाही चर्चेत सहभाग घेतला नाही, तर केवळ गोंधळ घालण्याचे काम केले. विरोधकांना पेपरफुटीसारख्या गंभीर विषयाशी काहीही देणेघेणे नसून, केवळ चॅनेलवर आपले तोंड दिसावे आणि प्रसिद्धी मिळावी, यासाठीच हा सर्व आटापिटा सुरू असल्याचा घणाघात त्यांनी केला. तसेच, देशात घडलेले पेपरफुटीचे प्रकार अत्यंत दुर्दैवी आहेत, हे मान्य केले तरी यापूर्वीच्या काळातही असे प्रकार घडले आहेत, अशी आठवण त्यांनी करून दिली. पंतप्रधान सभागृहात येत असतात, मात्र कोणताही पंतप्रधान संपूर्ण अधिवेशन संपेपर्यंत पूर्णवेळ सभागृहात बसून राहत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस यांनी गुंडांची टोळी तयार केल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता. यावर प्रत्युत्तर देताना रावसाहेब दानवे म्हणाले की, खरे गुंड आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक नेमके कुणासोबत आहेत, हे महाराष्ट्राची जनताळ चांगल्या प्रकारे जाणते. वास्तविक पाहता, यांच्याच पक्षात आणि यांच्याच मंत्रिमंडळात असलेलले लोक कोणत्या पार्श्वभूमीतून आले आहेत, हे तपासावे. महाराष्ट्राच्या सुजाण जनतेने नेहमीच मातीचे राजकारण ओळखले असून, नको असलेल्या लोकांना निवडणुकीत साफ मातीत मिळवले आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेल्या अत्यंत खालच्या पातळीवरील टीकेचा रावसाहेब दानवे यांनी तीव्र निषेध केला. ते म्हणाले की, कोणत्याही राजकीय पक्षावर किंवा विशेषतः महिला नेत्यावर अशा प्रकारची वैयक्तिक टीका करणे अतिशय चुकीचे आहे. सुनेत्रा पवार या राजकारणात तुलनेने नवीन आहेत. अजित दादांच्या जाण्यानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याची मोठी जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर सोपवली आहे, त्यामुळे त्यांच्या सध्याच्या कामाचे अशा प्रकारे मूल्यमापन करणे चुकीचे आहे. विरोधकांचे असे वर्णन करणे ही काँग्रेस पक्षाची सुरुवाती पासूनची जुनी संस्कृती राहिली आहे, कारण ते कधीही कोणाचे चांगले बोलू शकत नाहीत, अशा शब्दांत दानवेंनी काँग्रेसवर निशाणा साधला.

बांकीपूर पराभवाने विरोधकांना बळ; राऊतांचे स्पष्टीकरण
मुंबई: देशातील तीन राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. विशेषतः भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या रिक्त झालेल्या आणि सलग ३० वर्षे भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या बिहारमधील बांकीपूर मतदारसंघात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून, हा निकाल म्हणजे मोदी सरकार आणि भाजपच्या घसरत चाललेल्या लोक प्रियतेचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे. तसेच, यावेळी पत्रकार परिषदेत राम मंदिरातील कथित दान चोरीवरून सत्ताधाऱ्यांना घेरणाऱ्या संजय राऊतांना जेव्हा सिद्धिविनायक मंदिरातील चोरीच्या प्रकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी यावर सावध पवित्रा घेतला.

बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील निकालांवर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, ही जागा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी यापूर्वी मोठ्या मताधिक्याने जिंकली होती. मात्र, आता ती राखण्यात भाजपला अपयश आले आहे. पोटनिवडणुकीच्या या निकालांमुळे देशभरातील विरोधी पक्षांचा आत्मविश्वास दुप्पट वाढला आहे. इतिहासाचा दाखला देत ते म्हणाले की, अलाहाबाद पोटनिवडणुकीत व्ही.पी. सिंग यांच्या विजयानंतर ज्याप्रमाणे काँग्रेसच्या पतनाला सुरुवात झाली होती, तसेच काहीसे चित्र आता पाहायला मिळत आहे. जनतेचा विरोधक आणि महाविकास आघाडीच्या भूमिकेला आता भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे यावरून स्पष्ट होते.

पत्रकार परिषदेत राम मंदिरातील दानाच्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका करणाऱ्या संजय राऊतांना, मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणाबाबत आणि शिवसेना नेत्या विशाखा राऊत यांच्यावर केलेल्या आरोपांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत उत्तर देत म्हटले की, “ज्या गोष्टीबद्दल मला सविस्तर माहिती नाही, त्या विषयावर मी बोलणार नाही. हा एक तांत्रिक मुद्दा असून मी या प्रकरणाच्या खोलात गेलेलो नाही, त्यामुळे यावर माझे भाष्य करणे योग्य ठरणार नाही.”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या 'जेन झी' (Gen-Z) तरुणांसोबतच्या संवादाच्या शक्यतेवर बोलताना संजय राऊतांनी जोरदार टोला लगावला. ते म्हणाले की, संघाच्या किंवा भाजपच्या नेत्यांची मुले आणि नातवंडं म्हणजे 'जेन झी' नव्हेत. 'जेन झी' म्हणजे ती तरुण मुलं आहेत, ज्यांनी जंतर-मंतरवर येऊन प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन केले, घोषणा दिल्या आणि ज्यांच्यावर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. संघाच्या प्रमुखांमध्ये खरोखरच संवाद साधण्याची इच्छा असेल, तर त्या आंदोलक मुलांपैकी दोन हजार मुलांना चर्चेसाठी बोलवावे आणि त्यांच्याशी संवाद साधावा, असे आव्हानही राऊतांनी यावेळी दिले.

बांकीपूरच्या निकालांवर भाजप करणार आत्मपरीक्षण
नवी दिल्ली: देशातील तीन महत्त्वाच्या राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, यामध्ये भारतीय जनता पक्षाला संमिश्र यश मिळाले आहे. विशेष म्हणजे, मागील ३० वर्षे सातत्याने सत्तेत असलेल्या बिहारमधील हाय-प्रोफाइल बांकीपूर आणि मध्य प्रदेशातील दतिया या दोन्ही मतदारसंघांत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर नितीन नवीन यांनी स्वतः आमदार पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या बांकीपूर मतदारसंघात प्रशांत किशोर यांनी दणदणीत विजय मिळवत भाजपला मोठा धक्का दिला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून, निकालाचे अत्यंत गंभीर आत्मपरीक्षण करून पराभवाची कारणे शोधली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

देशातील तीन राज्यांमधील विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. बिहारमधील बांकीपूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, येथे प्रशांत किशोर यांच्या पक्ष वा उमेदवाराने जोरदार मुसंडी मारत हा गड सर केला. दुसरीकडे, मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा मतदार संघातही भाजपला पराभवाचा पराभव स्वीकारावा लागला. मात्र, या पडझडीच्या काळात गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील मांजलपूर विधानसभा मतदारसंघात मात्र भाजपने आपला दबदबा कायम राखला. मांजलपूरमध्ये भाजपचे उमेदवार सतीश गोविंदभाई पटेल यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भीखाभाई रबारी यांचा तब्बल ३० हजार ६३० मतांच्या मोठ्या फरकाने पराभव करत दणदणीत विजय मिळवला.

निवडणूक निकाल समोर आल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षयांनी अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (ट्विटर) वर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले की, "तीन विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये जनतेने दिलेला कौल आम्ही पूर्ण नम्रतेने स्वीकारतो. बांकीपूर आणि दतिया येथील निकालांचे अत्यंत गांभीर्याने आत्मपरीक्षण केले जाईल. पराभवामागील कारणांचा सखोल अभ्यास करून, नव्या ऊर्जेसह आणि नव्या संकल्पाने आम्ही पुन्हा जनतेच्या दारात जाऊ आणि लोकांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू."

तसेच, गुजरातमधील मांजलपूर मतदारसंघात पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचे कौतुक करताना त्यांनी पुढे लिहिले की, "मांजलपूरच्या महान जनतेने भाजपवरील आपला अफाट विश्वास पुन्हा एकदा सिद्ध केला आहे, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. या विजयासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सर्व समर्पित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन."

बांकीपूरमधील या पराभवानंतर भाजपच्या आगामी रणनीतीमध्ये काय बदल होतात आणि पक्ष कसा पुनरागमन करतो, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.