ताजी बातमी.Sunil Tatkare - Lokprant

राष्ट्रवादीत नेतृत्वबदलाची चर्चा; प्रशांत किशोर यांच्या नियुक्तीवर सुनील तटकरेंचा मोठा खुलासा
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या कथित नियुक्तीवरून आणि त्यांनी सुचवलेल्या नेतृत्वबदलाच्या सल्ल्यावरून सध्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रशांत किशोर यांची पक्षाच्या रणनीतीकार पदी नियुक्ती झाल्याबाबत आपल्याला कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचे तटकरे यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. तसेच, आपण एक व्यावहारिक राजकारणी असून कोणत्याही राजकीय रणनीतीकारांवर आपण अवलंबून नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

ज्येष्ठ राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची त्यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. या अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या बैठकीत प्रशांत किशोर यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या राज्यातील संघटनेत मोठ्या फेरबदलांची आवश्यकता व्यक्त केल्याची चर्चा आहे. यामध्ये पक्षाचा चेहरा बदलण्यासाठी आणि नवचैतन्य निर्माण करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा मुद्दाही मांडण्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

याच चर्चेला उत्तर देताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, प्रशांत किशोर यांच्या नियुक्तीबाबत मला काहीच माहिती नाही. तसेच, प्रदेशाध्यक्ष पदात किंवा नेतृत्वबदल करण्याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही आपल्याला अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे अशा चर्चांवर आत्ताच भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे ते म्हणाले.

आपल्या प्रदीर्घ राजकीय प्रवासाचा दाखला देत तटकरे यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “मी गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ सक्रिय राजकारणात काम करत आहे. मी नेहमीच जमिनीवर आणि थेट लोकांमध्ये जाऊन काम करणारा एक व्यावहारिक राजकारणी आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय रणनीतीकारांवर किंवा त्यांच्या सल्ल्यांवर मला भाष्य करायचे नाही. निदान माझ्या स्वतःच्या मतदार संघात तरी मी कधीही रणनीतीकारांवर विसंबून राहत नाही किंवा त्यांच्यावर अवलंबून नसतो.”

निवडणुका जिंकण्यासाठी रणनीतीकारांच्या सूत्रांपेक्षा आपली राजकीय प्रगल्भता, जनसंपर्क आणि प्रत्यक्ष जमिनीवरचा अनुभव माझ्यासाठी अधिक महत्त्वाचा आहे, असेही तटकरे यांनी निक्षून सांगितले. मात्र, आजच्या आधुनिक राजकारणात व्यापक आणि राष्ट्रीय पातळीवर पक्षांसाठी रणनीतीकारांची एक विशिष्ट आणि महत्त्वाची भूमिका असू शकते, हे वास्तवही त्यांनी प्रांजळपणे मान्य केले. या स्पष्टीकरणानंतर आता प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिलगिरी व्यक्त करून विषय संपत नाही'; सुनील तटकरेंचा काँग्रेसवर निशाणा
मुंबई: काँग्रेस पक्षाकडून राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या विरोधात करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पत्रकार परिषदेत काल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घुसून जोरदार गोंधळ घातला होता. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज विशेष पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेसने केवळ दिलगिरी व्यक्त केली म्हणून हा विषय संपत नाही, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, “काँग्रेसने सुनेत्रा पवारां संदर्भातील केलेल्या पोस्टचा मी तीव्र निषेध करतो. काँग्रेसने याद्वारे आपली वैचारिक दिवाळखोरी दाखवून दिली आहे. त्यांच्या या अपमानास्पद वागणुकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्या संतप्त भावना व्यक्त करत आहेत. काल रात्री उशिरा काँग्रेसने जरी दिलगिरी व्यक्त केली असली, तरी केवळ दिलगिरी व्यक्त करून हा विषय संपत नाही. सार्वजनिक जीवनात काय बोलावे आणि कशाचे भान ठेवावे, याचे किमान ज्ञान असावे लागते; परंतु दुर्दैवाने काँग्रेसचे राज्य पातळी वरील नेतृत्व हे विसरलेले दिसते,” असा घणाघात त्यांनी केला.

काँग्रेस पक्षाकडून अशा प्रकारची खालच्या पातळीवर टीका होण्यामागे राजकीय कारण असल्याचे सांगत तटकरे म्हणाले की, “अजित दादांच्या अकाली निधनानंतर जनतेच्या मनात दादांबद्दल असलेल्या अफाट भावना आणि नुकतीच राज्यभरात पक्षा पलीकडे जाऊन नागरिकांनी व शेतकऱ्यांनी साजरी केलेली दादांची प्रथम जयंती सर्वांनी पाहिली आहे. आज सुनेत्रा वहिनी ज्या पद्धतीने अत्यंत प्रभावीपणे आणि लोकाभिमुख काम करत आहेत, त्यामुळे काँग्रेसच्या राजकीय भवितव्याची चिंता असणारी मंडळी अशा प्रकारची हीन पातळीवरील टीका करत राहणार आहेत. मात्र, आम्ही आमच्या कामातून उत्तर देत राहू.”

खासदार संजय राऊत यांनी सुनेत्रा पवारांवरील टीका ही त्या अजित पवारांच्या पत्नी आहेत म्हणून नव्हे, तर त्या एका घटनात्मक पदावर आहेत म्हणून होत आहे, असे म्हटले होते. यावर प्रत्युत्तर देताना सुनील तटकरे म्हणाले की, “राऊतांना बहुधा हे माहीत नाहीये की, वहिनी प्रशासनात अत्यंत प्रभावीपणे काम करत आहेत. त्या आपले विचार नेहमीच स्पष्टपणे मांडत असतात आणि अनेकदा पत्रकारांशीही संवाद साधतात. त्यामुळे संजय राऊतांच्या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला अजिबात गरज नाही.”

दरम्यान, प्रसार माध्यम प्रतिनिधींच्या रोषावर स्पष्टीकरण देताना सुनील तटकरे म्हणाले की, “उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री म्हणून वहिनी विविध शासकीय बैठका घेत असतात. अशा बैठकांनंतर पत्रकारां सोबत होणाऱ्या संवादाची व व्यवस्थेची जबाबदारी जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा माहिती अधिकाऱ्याची असते. पत्रकारांचा रोष हा मुख्यत्वे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती अधिकाऱ्यावर होता.” या तांत्रिक मुद्द्याचा विपर्यास करून काँग्रेसने केलेली टीका अत्यंत चुकीची आणि निषेधार्ह असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.