Kharif Crops Insurance - Lokprant

गोंदवले शाखेत 'प्रधानमंत्री पीक विमा' मार्गदर्शन वर्ग संपन्न; १० ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्जाचे आवाहन
​दहिवडी: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गोंदवले शाखेत 'सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना' (PMFBY) खरीप हंगाम २०२६ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विभागीय विकास अधिकारी श्री. भाऊसाहेब शिंगाडे साहेब, गोंदवले शाखेच्या शाखाप्रमुख सो. मनीषा काळे, क्लार्क श्री. अमित खुस्पे तसेच एफएलसी (FLC) समन्वयक श्री. सागर पवार प्रमुख उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे होणाऱ्या संभाव्य पिकांच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळवण्यासाठी माण तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

​ बैठकीदरम्यान एफएलसी समन्वयक सागर पवार यांनी पीक विमा योजनेच्या तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले. सुधारित नियमांनुसार योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे 'ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी' असणे आणि 'डिजिटल पीक पाहणी' अंतर्गत पिकांची अचूक नोंद करणे बंधनकारक आहे. माण तालुक्यातील खरीप हंगामातील बाजरी, भुईमूग, मूग, मका आणि कांदा यांसारख्या अधिसूचित पिकांसाठी ही योजना लागू असून, किमान ०.१० हेक्टर (१० आर) क्षेत्र असणारे शेतकरी अर्ज करू शकतात. शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी केवळ २ टक्के तर कांद्यासारख्या नगदी पिकासाठी ५ टक्के इतकाच मर्यादित विमा हप्ता भरावा लागणार आहे.

​१० ऑगस्ट अंतिम मुदत:-

या योजनेचा ऑनलाईन पीक विमा अर्ज स्वीकारण्यासाठी शासनाने १० ऑगस्ट ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नसल्याने, तालुक्यातील सर्व कर्जदार व बिगर-कर्जदार शेतकऱ्यांनी वेळेत आपले अर्ज ऑनलाइन पोर्टलवर सादर करावेत, असे स्पष्ट करण्यात आले. गोंदवले शाखेच्या शाखाप्रमुख सो. मनीषा काळे यांनी बँकेमार्फत शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली, तसेच बोगस नोंदणी किंवा फेरफार केल्यास ५ वर्षांची शासकीय बंदी व कायदेशीर कारवाई होऊ शकते या कडक नियमांचीही जाणीव करून दिली.