महाराष्ट्र न्यूज.MSRTC - Lokprant

एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ‘एनसीएमसी स्मार्ट कार्ड’ अनिवार्य; १ कोटींहून अधिक प्रवाशांची नोंदणी पूर्ण
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ‘लालपरी’चा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि डिजिटल करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नॅशनल कॉमन मॉबिलिटी कार्ड (NCMC) स्मार्ट कार्ड उपक्रमाला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. एसटी महामंडळाच्या या आधुनिक प्रवासाच्या संकल्पनेला प्रवाशांनी मोठा पाठिंबा दिल्याचे समोर आले आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, १२ ऑगस्टपर्यंत राज्यात तब्बल १ कोटी १ लाख ७३ हजार ८३८ प्रवाशांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी यशस्वी नोंदणी केली असून, त्यापैकी ६४ लाख ९१ हजार ६५ कार्डे आतापर्यंत सक्रिय (Active) झाली आहेत.

एसटी प्रवासातील तिकीट व्यवहार पूर्णपणे कॅशलेस, पारदर्शक आणि सोपे करण्याच्या उद्देशाने महामंडळाने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सध्या पहिल्या टप्प्यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना हे स्मार्ट कार्ड वितरित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, आगामी १ सप्टेंबरपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी प्रवासात एनसीएमसी स्मार्ट कार्ड सक्तीचे (अनिवार्य) करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या पात्र लाभार्थ्यांनी अद्याप या कार्डसाठी नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने जवळच्या आगार किंवा बसस्थानकावर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

या डिजिटल परिवर्तना बाबत बोलताना परिवहन मंत्र्यांनी सांगितले की, “सामान्यांची वाहिनी असलेली आमची ‘लालपरी’ काळानुरूप अधिक आधुनिक आणि प्रवाशाभिमुख बनवण्याचा आमचा सतत प्रयत्न आहे. एनसीएमसी स्मार्ट कार्डला मिळणारा हा प्रचंड प्रतिसाद प्रवाशांचा या डिजिटल व्यवस्थेवरील विश्वास दर्शवतो. भविष्यात एसटीच्या सेवेमध्ये तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाचवणे आणि त्यांचा प्रवास अधिक सुखकर करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.”

१५ ऑगस्टपासून शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष नोंदणी मोहीम

सामान्य प्रवाशां प्रमाणेच विद्यार्थ्यांच्या प्रवासालाही सुलभ करण्यासाठी १५ ऑगस्टपासून राज्यभरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्डच्या नोंदणीची विशेष प्रक्रिया सुरू केली जात आहे. यासाठी एसटी महामंडळाचे अधिकृत परवानाधारक प्रतिनिधी थेट प्रत्येक शाळेत जाऊन ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी इतर कोणत्याही अनधिकृत ठिकाणी नोंदणी करू नये, असे स्पष्ट निर्देश महामंडळाने दिले आहेत. हे स्मार्ट कार्ड प्रवाशांना अधिकृत एसटी आगार, बसस्थानक तसेच अधिकृत एजंट नेटवर्कच्या माध्यमातून सहज प्राप्त करता येणार असून, कार्ड रिचार्ज करण्याची सुविधाही याच माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोठा दिलासा; ५,२२० जादा एसटी बसगाड्या धावणार
मुंबई: श्री गणरायाचे आगमन आगामी १४ सप्टेंबर रोजी होत असून, लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) पूर्णपणे सज्ज झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातील लाखो कोकणवासीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या गणेशोत्सवा निमित्त यंदा एसटी महामंडळाने ७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत तब्बल ५,२२० जादा बसेस सोडण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी मुंबईत एका उच्चस्तरीय आढावा बैठकीत ही घोषणा केली आहे.

मंत्रालयात पार पडलेल्या गणेशोत्सवाच्या जादा वाहतुकीच्या नियोजना संदर्भातील आढावा बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह महामंडळाचे सर्व प्रमुख विभागप्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, गणेशोत्सव हा कोकणवासीयांच्या भावविश्वाशी आणि संस्कृतीशी अत्यंत घट्ट जोडलेला सण आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही नफा-तोट्याचा कोणताही विचार न करता कोकणात जाणाऱ्या सर्व प्रवाशांच्या सुलभ प्रवासासाठी एसटी महामंडळ सदैव तत्पर आहे. यंदा कोकणातील विविध मार्गांवर ५,२२० जादा बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार आहेत.

या विशेष जादा बसेसचे आगाऊ आरक्षण एसटी महामंडळाच्या npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रवाशांना केवळ बसस्थानकांवरच नव्हे, तर ‘MSRTC Bus Reservation’ या अधिकृत मोबाईल ॲप्लिकेशनद्वारेही घरबसल्या सहजतेने आरक्षण करता येणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटीने ५,२०० जादा बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या, ज्यास भाविक व प्रवाशांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. याच धर्तीवर गणेशोत्सवासाठीही मोठ्या प्रमाणावर जादा बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आगामी १० ऑगस्टपासून किमान ४० प्रवाशांच्या गटासाठी ‘गट आरक्षणाची’ विशेष सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या गट आरक्षणामध्ये महिला व ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत, तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण म्हणजेच १०० टक्के भाडे सवलत लागू असणार आहे.

आगामी ७ सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातील प्रमुख बसस्थानकांतून या जादा बसेसचे नियमित संचालन सुरू होणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोकण मार्गावरील एसटीची वाहतूक अतिशय सुरळीत पार पाडावी, यासाठी सर्व प्रमुख बसस्थानके आणि बसथांब्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष देखरेखी खाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील प्रमुख महामार्गांवर तातडीच्या मदतीसाठी आवश्यक त्या ठिकाणी विशेष वाहनदुरुस्ती पथके तैनात केली जाणार आहेत, जेणेकरून कोकणात जाणाऱ्या सर्व प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि अखंडित सेवा प्रदान करता येईल.