देणगी घोटाळा - Lokprant

सिद्धिविनायक देणगी घोटाळ्याची चौकशी; फडणवीसांचे उच्चस्तरीय आदेश
मुंबई: अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चर्चा देशभरात सुरू असतानाच, आता महाराष्ट्रातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी आणि दानचोरी प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यापूर्वी मंदिरात मोठ्या प्रमाणावर देणगी चोरी होत असल्याचा गंभीर दावा केला होता, ज्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने या प्रकरणाच्या सखोल चौकशीचा बडगा उगारला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानुसार, सिद्धिविनायक मंदिरात गेल्या पाच वर्षांत मिळालेली देणगी, दान संकलन आणि मौल्यवान वस्तूंच्या आर्थिक नोंदींची कसून तपासणी केली जाणार आहे. प्रामुख्याने २०२३ ते २०२६ या कालावधीतील देणगी संकलनातील चढ-उतारांची आणि मंदिर ट्रस्टच्या सर्व आर्थिक व्यवहारांची पडताळणी केली जाईल. ही चौकशी पूर्ण करून संबंधित यंत्रणेला किंवा अतिरिक्त मुख्य सचिवांना तातडीने सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. हा अहवाल सादर झाल्यानंतर या कथित घोटाळ्या प्रकरणी पुढील कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काही दिवसांपूर्वी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर आणि कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शासकीय निवासस्थानी भेट घेत या विषयावर सविस्तर चर्चा केली होती. या भेटी दरम्यान मंदिरातील कारभारावर आणि होत असलेल्या आरोपांवर चर्चा करण्यात आली. या कथित अनियमितते बद्दल आणि प्रशासकीय त्रुटींबद्दलही सखोल पडताळणी केली जाणार आहे. या सर्व कालावधीत नेमकी कोणती अनियमितता, चोरी किंवा कागदोपत्री त्रुटी होत्या का, याचा शोध या उच्चस्तरीय चौकशीच्या माध्यमातून घेतला जाणार असून, या संपूर्ण प्रकरणाची सत्यता लवकरच समोर येणार आहे.