नागरी सहकारी बँका - Lokprant

महाराष्ट्रात येणार राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त महामंडळाचे मुख्यालय; अमित शाहांची घोषणा
मुंबई: अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला अधिक आधुनिक, पारदर्शक, विश्वासार्ह आणि तंत्रज्ञानाधिष्ठित बनविण्यासाठी ‘अंब्रेला ऑर्गनायझेशन’ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक तहसीलपर्यंत अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंगचे जाळे विस्तारण्यास मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी केले. मुंबईतील बीएसई इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित ‘सहकार नव-क्रांती मेळावा’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी देशातील अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा करताना त्यांनी ‘राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचे’ (NUCFDC) मुख्यालय आता दिल्लीहून महाराष्ट्रात हलविण्यात येत असल्याचे जाहीर केले.

या उच्चस्तरीय कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पणन मंत्री जयकुमार रावल, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त विकास महामंडळाचे अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता, केंद्रीय सहकार मंत्रालयाचे सचिव डॉ. आशीष कुमार भूटानी यांच्यासह राज्यातील विविध अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांचे प्रमुख प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समारोहाला संबोधित करताना केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी देशातील प्रत्येक अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला, अगदी एकाच शाखेच्या बँकेनेही अंब्रेला ऑर्गनायझेशनचे सदस्यत्व घेण्याचे आवाहन केले. सदस्यत्व घेतल्यानंतर बँकांनी सुरक्षा संचालन केंद्राशी (सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर) जोडले जाणे बंधनकारक असल्याचे सांगत, यामुळे ठेवीदारांचा बँकांवरील विश्वास आणखी दृढ होईल आणि संपूर्ण बँकिंग प्रणाली अधिक सुरक्षित होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अंब्रेला संस्थेच्या माध्यमातून बँकिंग क्षेत्रातील नवीनतम सुधारणा, ‘म्यूल हंटर’सारख्या अत्याधुनिक सॉफ्टवेअर सुविधा आणि कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक प्रशिक्षण कार्यक्रम सहज उपलब्ध होणार आहेत. स्पर्धात्मक बँकिंग क्षेत्रात इतर व्यावसायिक बँकांच्या बरोबरीने उभे राहण्यासाठी तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा (RBI) विश्वास संपादन करण्यासाठी ही संस्था अत्यंत मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशातील सुमारे १,४०० अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांमध्ये एकूण सहा लाख कोटी रुपयांहून अधिक ठेवी जमा असून, देशाच्या आर्थिक विकासात या बँकांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. छोटे दुकानदार, व्यापारी, कुटीर उद्योग, एमएसएमई, स्थानिक व्यावसायिक, महिला बचत गट आणि मध्यमवर्गीयांच्या छोट्या कर्जाच्या गरजा मोठ्या बँका अनेकदा पूर्ण करू शकत नाहीत, मात्र तालुका पातळीवरील अर्बन को-ऑपरेटिव्ह बँका ही गरज अतिशय प्रभावीपणे भागवतात. कोणत्याही हमी किंवा तारणा शिवाय कर्ज देण्याची मर्यादा पूर्वी अडीच लाख रुपये होती, जी आता वाढवून पाच लाख रुपये करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या योजनेतील तब्बल ९९.७८ टक्के कर्जांची व्याजासह यशस्वी परतफेड झाली असून, यावरून छोट्या कर्जदारांची कर्जफेडीची अफाट क्षमता सिद्ध होत असल्याचे शाह यांनी नमूद केले.

महाराष्ट्रात तब्बल ४४९ सहकारी बँका कार्यरत असून देशाच्या सहकारी बँकिंग क्षेत्रात महाराष्ट्राचे योगदान सर्वाधिक आहे. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शहरी सहकारी बँका पसरलेल्या आहेत. हेच लक्षात घेऊन शहरी सहकारी बँकिंग क्षेत्राच्या अंब्रेला संस्थेचे मूळ मुख्यालय महाराष्ट्रात असणे अधिक उपयुक्त ठरेल, असे शाह यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०४७ पर्यंतच्या ‘विकसित भारताच्या’ स्वप्नाचा पुनरुच्चार करताना ते म्हणाले की, ‘सहकारातून समृद्धी’ म्हणजे केवळ बँक किंवा संस्थेची समृद्धी नव्हे, तर बँकेच्या प्रत्येक ग्राहकाला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे हा यामागचा मूळ उद्देश आहे.

आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन व्यवहारांसोबतच सायबर फसवणुकीचे प्रकारही झपाट्याने वाढले आहेत. त्यामुळे डिजिटल बँकिंग पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यासाठी फॉरेन्सिक तंत्रज्ञानाची मदत घेणे गरजेचे बनले आहे. राष्ट्रीय फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठा सोबत झालेल्या नव्या सामंजस्य करारामुळे सायबर सुरक्षा, डिजिटल फसवणूक प्रतिबंध, डिजिटल फॉरेन्सिक आणि बँकिंग सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. कार्यक्रमा दरम्यान केंद्रीय मंत्री शाह यांच्या हस्ते शहरी सहकारी बँकांसाठी सायबर सुरक्षे संदर्भातील ‘सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर’ (SOC) चे दूरस्थ पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी उप-महाव्यवस्थापक जी. पी. मिस्त्री लिखित ‘ऑपरेशनल रिस्क मॅनेजमेंट – अ प्रॅक्टिकल गाईड टू अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स’ या महत्त्वाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सहकार सीबीएस प्रणालीशी जोडल्या गेलेल्या पहिल्या सहा शहरी सहकारी बँकांच्या प्रतिनिधींचा विशेष सत्कार करण्यात आला आणि राष्ट्रीय सेवा बंडलअंतर्गत ‘कोर बँकिंग सर्व्हिस’चे लोकार्पण झाले. प्रास्ताविक ज्योतिंद्र मेहता यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रभात चतुर्वेदी यांनी मानले.