आरोग्य विभाग भरती - Lokprant

आरोग्य विभागातील रिक्त पदे भरणार; पदोन्नती प्रक्रियेलाही वेग
मुंबई: राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून देण्या बरोबरच सर्व प्रलंबित पदभरती आणि पदोन्नतीच्या प्रक्रियांना तीव्र गती देण्याचे सक्त निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. मुंबईतील आरोग्य भवन येथे आयोजित उच्चस्तरीय आढावा बैठकीत विभागातील आस्थापना विषयक विविध बाबींचा सविस्तर आढावा घेत त्यांनी प्रशासकीय कामकाजाला अधिक वेग देण्यावर भर दिला.

आरोग्य विभागाच्या कामकाजाचा थेट संबंध सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी आणि जीवांशी जोडलेला असल्याने कोणत्याही स्तरावर दिरंगाई किंवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा मंत्र्यांनी यावेळी दिला. प्रशासकीय निर्णय प्रक्रिया जलद करून नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. बैठकी दरम्यान आरोग्य विभागातील गट-क व गट-ड संवर्गातील नवीन पदभरतीच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आवश्यकतेनुसार तातडीने मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश देत पदभरतीची प्रक्रिया अनावश्यक विलंबाविना पूर्ण करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

याचबरोबर, अधिपरिचारिका (नर्सिंग स्टाफ) संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी, परिविक्षाधीन कालावधीची पूर्तता आणि त्यांच्या प्रलंबित पदोन्नतीचा मुद्दाही या बैठकीच्या केंद्रस्थानी होता. कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे प्रस्ताव अनावश्यकरीत्या प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घेऊन ही प्रक्रिया जलदगतीने पूर्ण केली जावी, असे निर्देश देण्यात आले. सेवाकाळात कर्मचाऱ्यांना योग्य संधी आणि पदोन्नती मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यासोबतच राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (NHM) कर्मचाऱ्यांच्या समावेशना संदर्भातील बाबींचाही आढावा घेण्यात आला असून, आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर नियमांनुसार आणि सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणताना फाईलचा प्रवास जलद करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. कोणत्याही प्रकरणात अनावश्यक विलंब होणार नाही, यासाठी प्रत्येक स्तरावर अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तालुका आरोग्य अधिकारी पदाच्या कर्तव्य व जबाबदारी निश्चितीबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीचा तसेच जिल्हा हिवताप अधिकारी संवर्गातील हिवताप कर्मचाऱ्यांमधून पदोन्नतीने नियुक्ती देण्याबाबतच्या प्रक्रियेचा आढावाही बैठकीत घेण्यात आला.

नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यक्षमतेने काम करणे अपेक्षित आहे. चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारांना प्रोत्साहन दिले जावे, परंतु शासकीय कामात कसूर किंवा दिरंगाई करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड दम त्यांनी भरला. बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करून सर्व प्रलंबित बाबी तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना देत त्यांनी आरोग्य यंत्रणेला अधिक लोकाभिमुख बनविण्याचे धोरण स्पष्ट केले. या महत्त्वपूर्ण बैठकीस आरोग्य विभागातील संबंधित वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.