बाभूळगाव - Lokprant

उमरीत क्रांती दिन उत्साहात; स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाला पालकमंत्री संजय राठोडांकडून अभिवादन
यवतमाळ: यवतमाळ ही संघर्ष आणि स्वाभिमानाची परंपरा लाभलेली भूमी असून, स्वातंत्र्य चळवळीत या मातीतील स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानाचे महत्त्व अतुलनीय आहे. या स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग आणि त्यांचे महान योगदान आजच्या पिढीसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. बाभूळगाव तालुक्यातील उमरी (शहीद) येथील हुतात्मा स्मारकात क्रांती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

या सोहळ्याची सुरुवात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झाली. यावेळी त्यांनी हुतात्मा यशवंत लुडबाजी पाळेकर आणि शहीद मधुकर घोटेकर यांच्यासह स्वातंत्र्य संग्रामातील सर्व वीरांच्या स्मृतीस भावपूर्ण अभिवादन केले. आपल्या भाषणात पालकमंत्री राठोड यांनी आजचा दिवस देशभक्ती आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देणारा असल्याचे सांगितले. इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी प्राणांची आहुती दिली, म्हणूनच आज आपण स्वतंत्र भारतात स्वाभिमानाने जगत आहोत. स्वातंत्र्याचा हा अमृतकाळ असून, देशाला विकसित आणि आत्मनिर्भर राष्ट्र बनवण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग मोलाचा आहे, असेही ते म्हणाले. केवळ सीमेवर लढणे म्हणजे देशसेवा नसून, शेतकरी, शिक्षक, विद्यार्थी, डॉक्टर, इंजिनिअर, वकील यांसारख्या प्रत्येक घटकाने आपल्या कामाप्रती प्रामाणिक राहून कर्तव्य पार पाडणे, हीच खरी राष्ट्रसेवा आहे, असे महत्त्वाचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

क्रांती दिनाच्या निमित्ताने जात, धर्म, भाषा आणि प्रांताच्या भिंती ओलांडून राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या महत्त्वपूर्ण दिवशी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ‘क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिन’ या विशेष कालावधीत १ लाख ११ हजार वृक्षलागवडीच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या वृक्षारोपण मोहिमेमुळे पर्यावरणाचे जतन आणि संवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचणार आहे.

या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उमरी येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर नृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. पालकमंत्री राठोड यांनी या चिमुरड्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचे कौतुक केले. यावेळी शहीद पत्नी संगीता घोटेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, नगराध्यक्ष संगीता मालखुरे यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवारातील सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी राष्ट्रहितासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेत हा क्रांती दिन उत्साहात साजरा केला.

जागतिक आदिवासी दिनी अनोखा उपक्रम; पालकमंत्र्यांनी कोलाम पाड्यावर साधला संवाद
यवतमाळ: जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी बाभूळगाव तालुक्यातील पिंपरी ईजारा येथील इंदिरानगर कोलाम पोडावर जाऊन आदिवासी बांधवांसोबत आपला पूर्ण दिवस व्यतीत केला. जमिनीवर बसून आदिवासी संस्कृतीचा आस्वाद घेत त्यांनी थेट लोकांशी संवाद साधला. या उपक्रमामुळे सत्ता आणि सामान्य जनता यांच्यातील अंतर कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. निसर्गाशी एकरूप झालेल्या आदिवासी संस्कृतीचा सन्मान करण्यासाठी पालकमंत्र्यांनी पोडावर पोहोचताच मोरपिसांचा पारंपरिक टोप परिधान करून आदिवासी बांधवांसोबत ढोलाच्या तालावर फेर धरला. यावेळी त्यांनी भगवान बिरसा मुंडा, क्रांतिवीर शामादादा कोलाम, राणी दुर्गावती आणि वीर बापुराव शेडमाके यांसारख्या महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन करत आदिवासी वारशाचा गौरव केला.

कार्यक्रमाचे सर्वात भावूक वैशिष्ट्य म्हणजे पालकमंत्री संजय राठोड यांनी आदिवासी महिलांचा सन्मान करत केलेले मातृवंदन. गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत ओवाळून केले, तर काही ज्येष्ठ महिलांनी पाय धुवून स्वागत केले असता, पालकमंत्र्यांनीही त्या महिलांचे पाय धुवून त्यांना आदरांजली वाहिली. या प्रसंगाने उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आले. आपल्या बोली भाषेचा अभिमान बाळगतच आधुनिक शिक्षण घेत प्रगती करावी, असे भावनिक आवाहन त्यांनी कोलाम समाजातील तरुणांना केले. आदिवासी बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी गावच्या चावडीवर ‘जनता दरबार’ भरवला. यावेळी त्यांनी केवळ आश्वासने न देता, उपस्थित अधिकाऱ्यांना तत्काळ अंमलबजावणीचे आदेश दिले.

कोलाम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून स्वतंत्र निधीची तरतूद केल्याची माहिती त्यांनी दिली. गावातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी गावात सुसज्ज अभ्यासिका, वाचनालय, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बससेवा, उच्च शिक्षणासाठी विशेष शिष्यवृत्ती आणि पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्रे उभारण्याचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यास त्यांनी प्रशासनाला सांगितले. याशिवाय महिला बचत गटांना बळकट करून स्थानिक उद्योगांना चालना देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. आदिवासी पोडाच्या समस्यांच्या निरंतर पाठपुराव्यासाठी एका विशेष स्वीय सहायकाची नियुक्ती केल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

कार्यक्रमाचा समारोप सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या स्नेहभोजनाने झाला. आदिवासी संस्कृतीतील परंपरेनुसार पालकमंत्र्यांनी चावडीवर सर्वांसोबत काळा चहा घेतला आणि त्यानंतर जमिनीवर मांडी घालून झुणका-भाकरीचा आस्वाद घेतला. या भेटीदरम्यान त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, महिला भजनी मंडळाला साहित्याचे वाटप आणि खेळाडूंना क्रिकेट किट देऊन त्यांच्यातील कौशल्याला प्रोत्साहन दिले. शासन जेव्हा स्वतःहून वंचितांच्या उंबरठ्यावर जाऊन त्यांच्या समस्या समजून घेते, तेव्हाच खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय आणि समावेशक विकासाची पहाट होते, ही भावना या कार्यक्रमानंतर सर्वत्र व्यक्त होत आहे. पालकमंत्री संजय राठोड यांचा हा संवेदनक्षम उपक्रम केवळ एक राजकीय दौरा न ठरता, आदिवासी बांधवांच्या मनात विश्वासाची नवी उमेद निर्माण करणारा ठरला आहे.