महाराष्ट्र न्यूज.Amol Balwadkar - Lokprant

विकास कामांचा निधी रद्द केल्याने बालवडकर संतप्त; निर्णय मागे घेण्याची मागणी
पुणे: पुणे महानगरपालिकेच्या (PMC) मुख्य सभेत कोथरूड विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्रमांक ९ मधील प्रस्तावित विकास कामांचा निधी फेरविचार प्रस्ताव आणून रद्द करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा निर्णय पूर्णपणे राजकीय द्वेष आणि वैमनस्यातून घेण्यात आल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केला असून, यामुळे प्रभाग ९ मधील नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राजकीय संघर्षात सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाला वेठीस धरू नये, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

प्रभाग क्रमांक ९ मधील रस्ते, ड्रेनेज लाईन, उद्याने तसेच इतर महत्त्वाच्या नागरी सुविधांच्या विकासासाठी यापूर्वी हा निधी अधिकृतपणे मंजूर करण्यात आला होता. मात्र, राजकीय दबावाखाली महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्य सभेत फेरविचाराचा प्रस्ताव आणून हा निधी रद्द करण्यात आल्याचा दावा बालवडकर यांनी केला आहे. यापूर्वी प्रभागातील विकास कामांचे ‘विशेष लेखा परीक्षण’ (Special Audit) करण्याचा घाट घालण्यात आला होता, आणि आता थेट प्रत्यक्ष विकास कामांचा निधीच रद्द करण्यात आल्यामुळे हा प्रकार केवळ अमोल बालवडकरांच्या विरोधातील राजकीय खेळी नसून थेट प्रभाग ९ मधील  सर्वसामान्य नागरिकांच्या विकासावर परिणाम करणारा निर्णय आहे, असे बालवडकर यांनी म्हटले आहे.

या निर्णयानंतर आक्रमक भूमिका घेत अमोल बालवडकर म्हणाले की, “माझ्याशी राजकीय मतभेद असतील तर त्यांनी राजकीय पातळीवर थेट लढा द्यावा, मात्र त्यासाठी प्रभाग ९ मधील जनतेच्या हक्काची विकासकामे रोखणे अत्यंत चुकीचे आहे.” रस्ते, ड्रेनेज आणि उद्यानांसारख्या मूलभूत सुविधा या कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक मालमत्ता नसून त्या सामान्य नागरिकांच्या हक्काच्या गरजा आहेत. “स्वतः काम करायचे नाही आणि दुसऱ्यालाही काम करू द्यायचे नाही,” अशी भूमिका घेतल्यामुळेच कोथरूडच्या नागरिकांवर अन्याय होत असल्याची टीका त्यांनी केली.

तसेच, अशा राजकीय अडथळ्यांमुळे प्रभागाच्या विकासाची गती कोणत्याही परिस्थितीत मंदावणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्व. अजितदादा पवार यांनी नेहमीच विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्याची शिकवण दिली आहे, त्यांचा हाच विचार पुढे नेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील विकासकामे यापुढेही अधिक जोमाने व ताकदीने सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महानगर पालिकेचा विकास निधी हा कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचा नसून नागरिकांच्या कष्टाच्या करातून जमा झालेला निधी आहे, त्यामुळे हा रद्द करण्यात आलेला निर्णय तात्काळ मागे घेऊन सर्व नियोजित विकासकामे पूर्ववत सुरू करावीत, अशी आक्रमक मागणी अमोल बालवडकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.

पुण्यात तिरंगा रॅलीवरून राजकारण तापले; २० हजार वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा अमोल बालवडकरांचा दावा
पुणे: भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुणे शहरात आयोजित करण्यात आलेल्या दुचाकी तिरंगा रॅलीवरून शहरातील राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी या रॅलीस तीव्र विरोध दर्शवत भाजपच्या नियोजनावर कडक शब्दांत संताप व्यक्त केला आहे. पुण्यात आधीच वाहतूक कोंडीची समस्या अतिशय बिकट असताना, १५ ते २० हजार दुचाकी रस्त्यावर आणून कसली राष्ट्रभक्ती दाखवत आहात? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत भाजप नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.

अमोल बालवडकर यांनी आपल्या आक्रमक भूमिकेत म्हटले आहे की, जगातील सर्वाधिक ट्रॅफिक असलेल्या शहरांच्या यादीत पुणे शहर सध्या पाचव्या क्रमांकावर पोहोचले आहे. अशा बिकट परिस्थितीत शहरातील प्रत्येक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्याला ५० ते १०० दुचाकी आणण्याचे टार्गेट देऊन हजारो गाड्या रस्त्यावर उतरवणे म्हणजे पुणेकरांच्या जीवाशी खेळण्या सारखे आहे. एकाच वेळी १५ ते २० हजार दुचाकी रस्त्यावर आल्यास शहरात मोठ्या प्रमाणावर ध्वनी व वायू प्रदूषण होईल, तसेच मोठ्या प्रमाणात इंधनाचा अपव्यय होईल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना नेहमीच इंधन बचतीचे आवाहन केले असताना, स्थानिक भाजप नेते मात्र हजारो गाड्यांचा लांबच लांब ताफा रस्त्यावर उतरवून विनाकारण प्रदूषण वाढवत आहेत, असा आरोप त्यांनी केला. या नियोजित रॅलीमुळे रस्त्यांवर प्रचंड ट्रॅफिक जाम होऊन आपत्कालीन परिस्थितीत धावणाऱ्या रुग्णवाहिका, रुग्ण, महिला आणि रोज कामानिमित्त बाहेर पडणारा नोकरदार वर्ग मोठ्या अडचणीत सापडेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

केवळ वरिष्ठ नेत्यांच्या नजरेत आपली ताकद दाखवण्यासाठी आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी सामान्य पुणेकरांना वेठीस धरू नका, असा ठाम दम देत बालवडकर यांनी भाजपला काही विधायक पर्यायी उपक्रमांची सूचना केली आहे. जर खऱ्या अर्थाने राष्ट्रभक्ती आणि समाजसेवा करायची असेल, तर दुचाकी रॅली काढण्याऐवजी शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करा, रस्त्यावरील जीवघेणे खड्डे बुजवा, रक्तदान शिबिरे आयोजित करा किंवा स्वच्छता अभियान राबवा, असे सुचवले आहे. जर भाजपने हा नियोजनशून्य हट्ट आणि रॅलीचा निर्णय रद्द केला नाही, तर आगामी काळात त्रस्त झालेले पुणेकर नागरिक स्वतःच्या पद्धतीने या प्रचंड वाहतूक कोंडीचा जाब भाजपला विचारल्याशिवाय राहणार नाहीत, असा गंभीर इशाराही नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिला आहे.