सात आरोपी अटक - Lokprant

सपोनि. गोसावींच्या नेतृत्वाखाली दहिवडी पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; सात आरोपी जेरबंद
​दहिवडी: माण तालुक्यातील लोधवडे येथे काही दिवसांपूर्वी पडलेल्या ₹२ लाख ६० हजारांच्या दरोड्याचा दहिवडी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावला आहे. या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या सातही संशयित आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ केली आहे. दहिवडी पोलिसांच्या या वेगवान कारवाईमुळे नागरिकांमधून कौतुक होत आहे.

​लोधवडे गावात काही दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून सुमारे ₹२,६०,००० चा मुद्देमाल लंपास केला होता. भरवस्तीत झालेल्या या दरोड्यामुळे लोधवडेसह संपूर्ण माण तालुक्यात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले होते. कोणतीही भक्कम सुगावा नसताना एवढ्या मोठ्या गुन्ह्याचा तपास करण्याचे मोठे आव्हान दहिवडी पोलिसांसमोर होते.

​सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाचे विशेष पथक तयार करण्यात आले.

​गुप्त बातमीदारांचे जाळे सक्रिय करून आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांचा माग काढला. सलग शोधमोहीम राबवून पोलिसांनी या दरोड्यातील सातही संशयितांना जेरबंद केले.

​ सुरुवातीला न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी पहिल्या कोठडीची मुदत संपल्यानंतर सातही आरोपींना पुन्हा दहिवडी न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करणे, तसेच इतर धागेदोरे शोधण्यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली. न्यायालयाने तपासाची गरज लक्षात घेऊन आरोपींना पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी सराईत आहेत का? तसेच त्यांचे इतर जिल्ह्यांत किंवा इतर काही गंभीर गुन्ह्यांमध्ये हात आहेत का? या दृष्टीने पोलीस सध्या सखोल चौकशी करत आहेत.​दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्याचा अल्पावधीत शोध लावून आरोपींच्या मुसक्या आवळल्यामुळे दहिवडी पोलिसांच्या कार्यपद्धतीचे कौतुक होत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, त्यांचे सहकारी अधिकारी व अमलबजावणी कर्मचाऱ्यांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे सर्वसामान्य नागरिकांमधील सुरक्षेची भावना अधिक दृढ झाली आहे. या प्रकरणात पुढील चौकशीत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.