मावळ बातम्या - Lokprant

मावळात विकासाची पोलखोल; कुसवली पठारावर रुग्णाला झोळीतून नेण्याची वेळ
पुणे: एकिकडे देश स्वातंत्र्याची ७९ वर्षे पूर्ण करत असताना आणि विकासाची नवनवीन शिखरे गाठत असल्याचा दावा केला जात असताना, दुसरीकडे मात्र वास्तवाचे दाहक चित्र चटका लावणारे आहे. मुंबई-पुण्यासारख्या प्रगत आणि मध्यवर्ती महानगरांना जोडणाऱ्या मावळ तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. पक्क्या रस्त्या अभावी मावळमधील कुसवली पठारावरील एका आजारी वृद्ध रुग्णाला उपचारासाठी ग्रामस्थांना चक्क झोळीतून वाहून नेण्याची वेळ आली आहे. हा संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होत असल्याच्या दाव्यांवर आणि प्रशासकीय कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

मावळ तालुका हा औद्योगिक आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टीने अत्यंत वेगाने विकसित होत असलेला भाग मानला जातो. या भागात रिंग रोड, एमआयडीसी (MIDC), मोठे पूल आणि विविध प्रकल्पांवर कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. मात्र, याच मावळ तालुक्यातील कुसवली पठार, धनगरवाडे आणि अनेक आदिवासी पाड्यांवर अजूनही साध्या पक्क्या रस्त्यांची सुविधा उपलब्ध नाही. विशेषतः पावसाळ्यात या भागातील परिस्थिती अत्यंत बिकट बनते. रस्त्यांच्या अभावामुळे आणि चिखलाच्या वाटांमुळे येथे वाहने तर सोडाच, पण चालणेही मुश्किल होते. अशा वेळी एखादी गर्भवती महिला, वृद्ध नागरिक, शालेय विद्यार्थी किंवा आजारी व्यक्ती अडकल्यास, त्यांना उपचारासाठी नेण्यासाठी ग्रामस्थांना एकत्र येऊन झोळी अथवा खांद्याचा आधार घ्यावा लागतो.

नुकत्याच घडलेल्या या घटनेमुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका थेट वाडीपर्यंत पोहोचू शकत नसल्याचे वास्तव पुन्हा एकदा पुढे आले आहे. अनेक निवडणुका आल्या, नवनवीन सरकारे आली आणि लोकप्रतिनिधी बदलले, परंतु दुर्गम भागातील नागरिकांचा मूलभूत रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही. मोठ्या शहरांमधील विकास कामांच्या गप्पा मारणाऱ्या यंत्रणेने आमच्या वाड्या-पाड्यांकडेही लक्ष द्यावे, अशीर्त मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. “विकासाच्या गप्पा नकोत, आधी आम्हाला बारमाही पक्का रस्ता द्या,” अशी संतप्त भावना व्यक्त करत, कोणत्याही नागरिकाला उपचारासाठी पुन्हा झोळीचा आधार घेण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.

पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; चार तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर
सातारा: पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळ मध्यरात्री एक भीषण अपघात झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. भरधाव टाटा नेक्सॉन कारवरील ताबा सुटल्याने झालेल्या या अपघातात मावळ आणि तळेगाव दाभाडे परिसरातील चार तरुण जागीच ठार झाले असून, अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे तळेगाव दाभाडे परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने एका कारमधून काही तरुण प्रवास करत होते. रात्री १ वाजण्याच्या सुमारास शिरवळ येथील हॉटेल शिवालयसमोर आली असता, चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने तीव्र वळणावर किंवा अनपेक्षितपणे गाडी दुभाजकाला (डिव्हायडर) धडकली. टक्कर इतकी तीव्र होती की कार डिव्हायडर ओलांडून थेट विरुद्ध दिशेच्या लेनवर जाऊन धडकली. त्याच वेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकला या कारने जोरदार धडक दिली. आतील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली आणि कारचे दरवाजे कापून मयतांना व जखमींना बाहेर काढण्यात आले.

या भीषण अपघातात जागीच प्राण गमावलेल्या दुर्दैवी तरुणांची नावे वेदांत वारिंगे, सोनलिंग ठाकूर, आदित्य गरूड आणि निखिल राऊत अशी आहेत. अपघातानंतर झालेला मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिक तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी तत्काळ पोलिसांना व महामार्ग सुरक्षारक्षकांना याची माहिती दिली. महामार्ग पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पोहोचत क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला केली आणि महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या इतर दोन तरुणांना तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत.