Lok Sabha Adjourned - Lokprant

संसदेचे पावसाळी अधिवेशन संपले; मोदी-शहा सभागृहात, कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडल्या. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसदेत पोहोचले, मात्र सभागृहात दाखल होताच लोकसभेचे कामकाज सुरू झाले आणि अवघ्या काही वेळातच ते अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, परंतु कामकाज स्थगित झाल्यामुळे आता हे अधिवेशन अधिकृतपणे संपन्न झाले आहे.

पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात विविध मुद्द्यांवरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांची उपस्थिती अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात होती. मात्र, सभागृहाचे कामकाज सुरू होताच पीठासीन अधिकाऱ्यांनी ते अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याची घोषणा केली. यामुळे आता पावसाळी अधिवेशन औपचारिकरीत्या संपले असून, या अधिवेशनात कोणत्या महत्त्वपूर्ण विधेयकांवर चर्चा झाली आणि कोणती कामे मार्गी लागली, याचा आढावा आता सुरू झाला आहे. लोकसभा कामकाज स्थगित झाल्याच्या घोषणेनंतर आता राजकीय वर्तुळात आगामी काळातील रणनीती आणि हिवाळी अधिवेशनाच्या तयारीबाबत चर्चा सुरू झाली आहेत.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गदारोळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित
नवी दिल्ली: संसदेच्या चालू मान्सून अधिवेशनाला आता अवघे दोनच दिवस शिल्लक राहिले असताना, संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष टोकाला पोहोचल्याचे दिसत आहे. १३ ऑगस्ट रोजी मान्सून अधिवेशन संपण्यापूर्वी संसदेत तीव्र संघर्ष पाहायला मिळत असून, विविध ज्वलंत मुद्द्यांवरून कोणतीही बाजू माघार घेण्यास तयार नाही. राम मंदिरातील चढ़ावा चोरीच्या प्रकरणावर चर्चा आणि दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईच्या निषेधार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात येऊन स्पष्टीकरण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी काँग्रेससह सर्वपक्षीय विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रचंड गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करावे लागले आहे.

आजच्या दिवसाच्या सुरुवाती  पासूनच लोकसभेत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. “गृहमंत्री सभागृहात येऊन उत्तर द्या,” अशी मागणी करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी वेलमध्ये येऊन निदर्शने केली. यामुळे संसदेचे कामकाज सुरळीत चालवणे प्रशासना समोर मोठे आव्हान ठरले आहे. केवळ सभागृहाच्या आतच नव्हे, तर संसद भवन परिसराबाहेरही सत्ताधारी भाजप आणि विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही बाजूंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. विरोधी पक्षांनी केंद्राच्या धोरणा विरोधात निदर्शने केली, तर भाजप खासदारांनी झारखंडमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या मुद्यावरून तीव्र संताप व्यक्त करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

गेल्या काही दिवसांपासून संसदेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सातत्याने खडाजंगी सुरू आहे. कालही दोन्ही बाजूंनी जवळपास एकाच वेळी निदर्शने केल्याने संसद परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मान्सून अधिवेशनाचे केवळ दोनच दिवस उरले असताना, एका बाजूला विरोधक विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरत आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षही आक्रमक भूमिकेत पाहायला मिळत आहे. त्यामुळे उर्वरित दोन दिवसांतही संसदेच्या कामकाजात गदारोळ कायम राहण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.