महाराष्ट्र न्यूज.Parli - Lokprant

परळीत पशुवैद्यक महाविद्यालयाचा शुभारंभ; मराठवाड्याच्या विकासाला नवी दिशा
बीड: शेतकरी आणि पशुपालकांच्या समृद्धीला नवी दिशा देण्यासाठी बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे ६३४ कोटी रुपये खर्चाच्या अत्याधुनिक ‘पशूवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालया’चा कोनशिला समारंभ आणि भूमिपूजन सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. या महाविद्यालयामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे पशुवैद्यकीय शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.

या सोहळ्याला पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, आमदार नमिता मुंदडा, पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहेमान, पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्यासह अनेक अधिकारी, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, महाराष्ट्र हा कष्टकऱ्यांचा प्रदेश असून शेतीला मुख्य आधार असलेल्या पशुधनाची उत्तम काळजी घेणे ही काळाची गरज आहे. या क्षेत्रात उच्च शिक्षणासाठी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय परळीतच मिळणार आहे. या ६३४ कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात सुसज्ज प्रशासकीय इमारत, आधुनिक वसतिगृह, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि प्रगत संशोधन केंद्राची निर्मिती केली जाणार आहे. यामुळे परिसरातील ५० ते १०० गावांतील जनावरांवर आता परळीतच अत्याधुनिक उपचार करणे शक्य होणार असून दूध उत्पादन वाढवणे आणि फायदेशीर शेळीपालनावर विशेष संशोधन केले जाईल.

या महाविद्यालयातून केवळ पदवी घेऊन नोकरी शोधणारे डॉक्टर नव्हे, तर पेट केअर क्लिनीक, डेअरी सल्लागार आणि पशुखाद्य निर्मिती क्षेत्रात स्वतःचे उद्योग उभे करणारे सक्षम तरुण उद्योजक तयार व्हावेत, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, चालू शैक्षणिक वर्षापासूनच या महाविद्यालयाचे प्रवेश सुरू केले जाणार असून, हे बांधकाम अत्यंत दर्जेदार व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे सक्त निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. “समृद्ध शेतकरी, सुदृढ जनावर आणि स्वावलंबी मराठवाडा” निर्माण करण्याचा आमचा संकल्प असल्याचे त्या म्हणाल्या.

यावेळी मार्गदर्शन करताना पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले की, या पशुवैद्यक महाविद्यालयाच्या स्थापनेमुळे परळी आणि लगतच्या परिसराचा कायापालट होणार आहे. पशुपालकांना त्यांच्या जोडधंद्यासाठी आणि व्यवसायाच्या विस्तारासाठी शासन स्तरावरून ५० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाणार असून, या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.