Interview Fraud - Lokprant

सरकारी भरतीत ९९ टक्के हेराफेरीचा आरोप; रामदेवांचा इशारा
नवी दिल्ली: देशातील सरकारी नोकऱ्यांमधील कथित अनियमितता, भरती प्रक्रियेतील भ्रष्टाचार आणि मुलाखतीमधील गैरप्रकारांवर योगगुरू बाबा रामदेव यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारी नोकऱ्यांच्या मुलाखतींमध्ये मोठ्या प्रमाणावर हेराफेरी होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असून, विशिष्ट जाती, वर्ग किंवा गटातील लोकांनाच संधी दिली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. जर या व्यवस्थात्मक भ्रष्टाचारात तातडीने सुधारणा झाली नाही, तर पुन्हा एकदा देशव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिला.

नुकतेच नीट (NEET) पेपरफुटी प्रकरण आणि देशातील शिक्षण पद्धतीवरून तरुण वर्गात मोठी नाराजी पाहायला मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर बाबा रामदेव यांनी भरती प्रक्रियेतील त्रुटींवर प्रकाश टाकला आहे. सरकारी नोकरीच्या निवडीमध्ये मुलाखतीचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, मात्र याच टप्प्यात मोठ्या प्रमाणावर लाचखोरी, शिफारसी आणि गैरप्रकार होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. सुमारे ९० ते ९९ टक्के सरकारी नोकरीच्या मुलाखतींमध्ये हेराफेरी होत असल्याचा दावा करत, स्वतःच्या ओळखीच्या किंवा विशिष्ट जाती-वर्गातील व्यक्तींना झुकते माप देऊन इतर पात्र उमेदवारांवर अन्याय केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. भरती प्रक्रियेत पैशांचा खेळ चालत असेल तर त्यावर कठोर निर्बंध आणणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केवळ नोकऱ्यां मधील भ्रष्टाचारावरच नव्हे, तर देशातील शाळा आणि महाविद्यालयांमधील दुःस्थितीवरही बाबा रामदेव यांनी चिंता व्यक्त केली. अनेक भागांतील विद्यार्थी वीज, पाणी आणि पुस्तका सारख्या पायाभूत सुविधां अभावी त्रस्त असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, परीक्षांमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊनही विद्यार्थ्यांच्या दहावी-बारावीच्या गुणांना अपेक्षेनुसार महत्त्व मिळत नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. निवड प्रक्रिया पूर्णपणे स्पर्धात्मक आणि पारदर्शक असायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

देशातील वाढत्या अस्वस्थतेवर भाष्य करताना बाबा रामदेव यांनी आपण अराजकतेचे कधीही समर्थन करत नसल्याचे स्पष्ट केले, परंतु लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाय योजना होणे काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. सरकारी भरती प्रक्रियेतील आणि व्यवस्थेतील त्रुटी दूर न झाल्यास त्यांना तीव्र आंदोलनाचा सामना करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला. त्याचबरोबर, सर्व राजकीय पक्षांनी संकुचित राजकारण आणि आपापसातील मतभेद बाजूला सारून केवळ राष्ट्रीय हितासाठी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले. देशाच्या प्रगतीसाठी परस्पर द्वेष टाळून सकारात्मक विचारांनी काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.