महाराष्ट्र न्यूज.Pune - Lokprant

पुण्यात नोकरीच्या आमिषाने २४ लाखांची फसवणूक; दोघांवर कारवाई
पुणे: महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि राज्य उत्पादन शुल्क विभागासह विविध सरकारी खात्यांमध्ये उच्चपदावर नोकरी मिळवून देण्याचे मोठे आमिष दाखवून एका महिलेसह पाच तरुणांची तब्बल २४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा अत्यंत संताप जनक प्रकार पुणे शहरात उघडकीस आला आहे. आरोपींनी केवळ तोतयागिरी करून फसवणूक केली नाही, तर तरुणांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांची थेट ससून रुग्णालयात मेडिकल तपासणी घडवून आणत बनावट नियुक्तीपत्रे दिली होती. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी दोन मुख्य सूत्रधारांविरुद्ध कठोर गुन्हे दाखल केले आहेत.

सूर्यकांत विठ्ठल सपकाळ (वय ४६, रा. सेवाधाम हॉस्पिटल शेजारी, तळेगाव दाभाडे) आणि योगेश अदिकराव पाटील (वय ४२, रा. कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात एका पीडित महिलेने सविस्तर फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी महिला पर्वती परिसरात राहून घरकाम करून आपला उदरनिर्वाह करते. सामाजिक कार्य करत असताना एप्रिल २०२० मध्ये तिची ओळख सूर्यकांत सपकाळ याच्याशी झाली. त्याने आपण महसूल खात्यात अधिकारी असून मंत्रालयात आपली उच्च स्तरावर ओळख असल्याचे सांगितले. तसेच महसूल, रेल्वे आणि इतर शासकीय विभागांमध्ये गरजवंतांना परमनंट नोकरी मिळवून देण्याचे सांगत त्याने पीडितेचा विश्वास संपादन केला.

सुरुवातीला महसूल खात्यात शिपाई पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवत त्याने ५ लाखांची मागणी केली. त्यानंतर ऑक्टोबर २०२२ मध्ये शिपाई पदासाठी २ लाख रुपये रोख आणि कागदपत्रे घरात येऊन घेतली. इतरा कडूनही अशाच प्रकारे प्रत्येकी २ लाख रुपये उकळण्यात आले. फसवणुकीचा हा बनाव अधिक खरा वाटावा म्हणून त्याने समाज कल्याण आयुक्तालय यांचे सही व शिक्का असलेले पत्र पाठवून या तरुणांची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी (मेडिकल) करून घेतली. सरकारी यंत्रणे मार्फत सर्व प्रक्रिया होत असल्याने तरुणांचा त्यावर पूर्णपणे विश्वास बसला. यानंतर आणखी काहींना उत्पादन शुल्क विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागात ज्युनिअर इंजिनिअर व लिपिक पदावर नोकरीसाठी प्रत्येकी ७ लाखांची मागणी करत बनावट नियुक्तीपत्रे पाठवण्यात आली.

फसवणूक करणारे कट रचत ८ एप्रिल २०२६ रोजी या सर्व तरुणांना कागदपत्रे व नियुक्तीपत्रे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावले. तिथे योगेश पाटील हा व्यक्ती त्यांना भेटला आणि त्याने सर्व कागदपत्रे व पत्रे पुन्हा आपल्या ताब्यात घेत एका महिन्यात कामाची पूर्तता होईल, असे सांगून त्यांची बोळवण केली. त्यानंतर जेव्हा फिर्यादी आणि तरुणांनी नोकरी बाबत विचारणा सुरू केली, तेव्हा आरोपी उडवा उडवीची उत्तरे देऊ लागले. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी भरलेले पैसे परत मागितले. त्यावेळी आरोपींनी दिलेला धनादेश बँकेत न जुमानता खात्यात पैसे नसल्याने बाऊन्स झाला. यानंतर पीडितेने तातडीने पर्वती पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.

पुण्यात २०३२ च्या जागतिक सायकलिंग स्पर्धेसाठी तयारी
पुणे : पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची सायकलिंग स्पर्धा आयोजित करण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. २०३२ ची यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप पुण्यात आयोजित करण्यासाठी सरकारने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुण्याच्या क्रीडा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्थानाला नवी ओळख मिळण्याची शक्यता आहे.

पुण्यात नुकत्याच झालेल्या ‘पुणे ग्रँड टूर २०२६’ या सायकलिंग स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाल्याने पुण्याची दावेदारी अधिक मजबूत झाली आहे. जागतिक दर्जाची स्पर्धा आयोजित करण्यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक पत्रव्यवहार, आर्थिक हमी तसेच रस्ते आणि अन्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केले जाणार आहे.

या स्पर्धेच्या माध्यमातून देश-विदेशातील नामांकित सायकलपटू, प्रशिक्षक, क्रीडा अधिकारी आणि प्रेक्षक मोठ्या संख्येने पुण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील हॉटेल व्यवसाय, वाहतूक, पर्यटन, खाद्यपदार्थ व्यवसाय आणि स्थानिक उद्योगांना मोठी चालना मिळू शकते.

सरकारच्या अंदाजानुसार, या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमुळे पुण्यात सुमारे ३३० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०३२ ची ही स्पर्धा केवळ क्रीडा आयोजन न राहता पुण्याच्या पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ देणारा महत्त्वाचा उपक्रम ठरू शकतो.

केशवनगर-खराडी उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी
पुणे: पुणेकरांच्या वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नुकताच नागरिकांच्या सेवेत दाखल झालेल्या बहुचर्चित केशवनगर-खराडी उड्डाणपुलाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव देण्याबाबतची महत्त्वपूर्ण मागणी पुढे आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहन सुरवसे-पाटील यांनी यासंदर्भात पुढाकार घेत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांना अधिकृत निवेदन सादर केले असून, पुण्याच्या विकासात अमूल्य योगदान देणाऱ्या अजित दादांच्या कार्याचा गौरव म्हणून या पुलाचे नामकरण ‘दिवंगत अजितदादा पवार उड्डाणपूल’ असे करावे, अशी आग्रही मागणी केली आहे.

पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी रोखण्यासाठी आणि परिसरातील दळणवळण अधिक सुटसुटीत करण्यासाठी उभारण्यात आलेल्या या नव्या उड्डाण पुलाचे उद्घाटन नुकतेच (रविवार, १६ ऑगस्ट) मुंडवा येथील गोदरेज इन्फिनिटी जवळ केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाले. उद्घाटना नंतर हा मार्ग सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. पुणे शहराच्या सर्वांगीण विकासात आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारात अजितदादा पवार यांनी घेतलेला पुढाकार आणि राबवलेले प्रकल्प ऐतिहासिक आहेत. त्यांच्या याच विकासाभिमुख कार्याची प्रचिती कायम राहावी, या उद्देशाने या पुलाला त्यांचे नाव देण्याची विनंती करण्यात आली आहे.

केशवनगर आणि खराडी परिसराचा ताण कमी करणाऱ्या या प्रकल्पाची लांबी सुमारे ४११.४० मीटर असून रुंदी २४ मीटर इतकी आहे. या पुलावर एकूण सात गाळे असून प्रत्येक गाळ्याची लांबी ३५.२ मीटर आहे. खराडी बाजूकडील अप्रोच रस्ता ४० मीटर तर केशवनगर बाजूकडील अप्रोच रस्ता १२५ मीटर लांबीचा आहे. या प्रकल्पाची निविदा रक्कम २३.४७ कोटी रुपये असून आतापर्यंत सुमारे २३ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या पुलावरून दुतर्फा वाहनांची वाहतूक सुरू झाल्यामुळे केशवनगर कडून खराडीकडे जाणाऱ्या वाहन चालकांचा तब्बल सहा किलोमीटरचा अतिरिक्त वळसा आता टळणार आहे.

या प्रकल्पामुळे बायपास रस्त्यावरील प्रचंड ताण कमी होऊन वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या नागरिकांचा सुमारे अर्धा तास वाचणार आहे. वेळेची बचत होण्या बरोबरच इंधनाची मोठ्या प्रमाणावर बचत होणार असून, परिसरातील वायू व ध्वनी प्रदूषण कमी होण्यासही या पुलाचा मोलाचा हातभार लागणार आहे. त्यामुळे केशवनगर, खराडी आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना अधिक सुरक्षित, वेगवान आणि दर्जेदार वाहतूक व्यवस्था उपलब्ध झाली असून, या महत्त्वाच्या पुलाला अजितदादांचे नाव दिल्यास ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असा विश्वास रोहन सुरवसे-पाटील यांनी व्यक्त केला आहे.

जलसंधारणात पुण्याची मोठी मजल; जलसुरक्षेला मिळणार बळ
पुणे: पावसाचे प्रत्येक थेंब जमिनीत मुरवणे, उपलब्ध जलसाठ्यांची साठवणूक क्षमता वाढवणे आणि शेतीसाठी पाण्याची शाश्वत उपलब्धता सुनिश्चित करणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे. बदलते हवामान आणि पाण्याची वाढती गरज लक्षात घेता, पुणे जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना एकात्मिक आणि वेगवान स्वरूप देण्यात आले आहे. ‘जलसंधारण दिन’ व विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या जलसंधारणाच्या व्यापक कामांमुळे ग्रामीण भागाचा विकास अधिक सुकर होत असून, शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले उचलली जात आहेत.

जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना गती देण्यासाठी विविध विभागांच्या माध्यमातून समन्वयाचे धोरण अवलंबण्यात आले आहे. ‘गाळमुक्त धरण–गाळयुक्त शिवार योजना’, ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ आणि ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना–पाणलोट विकास घटक २.०’ या प्रमुख योजनांच्या माध्यमातून जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन, नाला खोलीकरण, मृदसंधारण आणि सूक्ष्म सिंचनाला विशेष प्रोत्साहन दिले जात आहे. विशेषतः ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजना’ जलसंधारण आणि शेती या दोन्ही दृष्टीने गेम चेंजर ठरत आहे. जलाशयांमध्ये वर्षानुवर्षे साचलेला गाळ बाहेर काढल्यामुळे पाण्याची साठवण क्षमता तर वाढलीच आहे, शिवाय हा पोषक गाळ शेतात टाकल्यामुळे जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता वाढण्यासही मोठी मदत झाली आहे. पुणे जिल्ह्यात गाळ काढण्याच्या नियोजित कामांपैकी ३८ कामांमधून तब्बल १२.३५ लाख घनमीटर गाळ यशस्वीपणे उपसण्यात आला आहे.

जलसंधारणाच्या कामांमध्ये पूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ अंतर्गत आधुनिक जिओ पोर्टलचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. जिल्ह्यातील नियोजित कामांपैकी ४ हजार ४८७ कामांचे वर्क आयडी तयार करण्यात आले असून, २ हजार ५१० कामे जिओ-टॅग (Geo-tagging) करण्यात आली आहेत. यामुळे कामांच्या प्रगतीवर थेट ऑनलाइन देखरेख ठेवणे सोपे झाले आहे. तसेच विविध विभागांच्या अभिसरणातून १८६ गावांमध्ये हजारो कामे मार्गी लावून ग्रामीण भागात जलसंधारणाचे जाळे पसरवण्यात आले आहे. कृषी, वन, मृद व जलसंधारण, भूजल सर्वेक्षण आणि मनरेगा यांसारख्या विविध यंत्रणांच्या समन्वयामुळे निधीचा अधिक प्रभावी वापर होत आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील ११ गावांमध्ये पाणलोट विकासाचे प्रकल्प वेगाने सुरू आहेत. वाफगाव, वरुडे, गाडकवाडी, गुळाणी, कन्हेरसर, पूर, जऊळके बुद्रुकसह परिसरातील गावांमध्ये नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनांतर्गत अनेक कामे पूर्ण झाली आहेत. याशिवाय, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना पीव्हीसी पाइप, विद्युत पंप, ठिबक व तुषार सिंचन पद्धतीसाठी आर्थिक अनुदान दिले जात आहे.

पुणे जिल्ह्यातील जलसंधारणाची ही वाटचाल केवळ काही मोजक्या बंधाऱ्यांपुरती मर्यादित नसून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे सूक्ष्म नियोजन करणारी एक शाश्वत चळवळ बनली आहे. विविध विभागांचे अभिसरण, तंत्रज्ञानाचा अचूक वापर आणि शेतकऱ्यांच्या थेट सहभागामुळे पुणे जिल्ह्याची भावी जलसुरक्षा अधिक मजबूत होण्यास मोठी मदत मिळणार आहे.

पुणे वाहतूक पोलिसांचा महापालिकेला ‘अलर्ट’ खड्डे, कोंडीवर तातडीने उपायांचे निर्देश
पुणे: पुणे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर प्रभावी अंकुश ठेवण्यासाठी आणि तिचे मूळ कारण नष्ट करण्यासाठी पोलीस प्रशासनाने आता आक्रमक पावले उचलली आहेत. वाहतूक पोलिसांनी केवळ रस्त्यावर उभे राहून वाहतूक सुरळीत करण्यापुरते मर्यादित न राहता, कोंडी निर्माण करणारी कारणे शोधून ती दूर करण्यासाठी सक्रिय पुढाकार घ्यावा, असे स्पष्ट निर्देश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. विशेषतः शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे हे वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण ठरत असून, या खड्ड्यांची अचूक माहिती महापालिकेला देऊन ती तातडीने बुजवून घेण्यासाठी प्रशासकीय समन्वय साधण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

शहरातील प्रमुख चौकांमध्ये निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचा पोलीस आयुक्तांनी स्वतंत्रपणे सखोल आढावा घेतला आहे. कोणत्या चौकात आणि नेमक्या कोणत्या कारणामुळे कोंडी होते, याची सविस्तर माहिती नकाशाच्या माध्यमातून समोर आणत ‘कोंडी कुठे आणि का?’ यावर विशेष भर देण्यात आला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावतो, तसेच वाहन चालकांना अचानक ब्रेक लावावे लागल्याने किंवा मार्ग बदलावा लागल्याने वाहतूक विस्कळीत होते. ही बाब गांभीर्याने घेत वाहतूक पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रातील रस्ते व चौकांची प्रत्यक्ष पाहणी करून वाहतुकीस अडथळा ठरणारे खड्डे शोधून काढण्याचे आदेश दिले आहेत. या खड्ड्यांची सविस्तर माहिती संबंधित क्षेत्रीय कार्यालय आणि महापालिकेला देऊन त्यांच्याशी समन्वय साधत हे खड्डे तत्काळ बुजवून घेण्याची कार्यवाही पोलिसांकडून केली जाणार आहे.

महापालिकेच्या वतीने अनेकदा रस्त्यांवर खड्डे नसल्याचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात शहरातील बहुतांश रस्त्यांची बिकट अवस्था वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर बाधित करत आहे. प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून वाहतूक नियमन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणत्या ठिकाणी खड्ड्यांमुळे वाहतुकीवर सर्वाधिक परिणाम होत आहे, याची अचूक माहिती मिळू शकते. याच पार्श्वभूमीवर पोलीस आणि महापालिका यांच्यात योग्य समन्वय साधून नागरिकांना सुरळीत व अडथळाविना वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे पाऊल उचलण्यात आले आहे. आयुक्तांच्या या निर्देशामुळे आगामी काळात पुणेकरांना वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांच्या त्रासातून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.