महाराष्ट्र न्यूज.Sunetra Pawar - Lokprant

पिंपळवंडी प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा मिळवून देणार; सुनेत्रा पवार
पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर अतिप्रसंग करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या अत्यंत दुर्दैवी, संताप जनक आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेची गंभीर दखल घेत पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर संवाद साधत तपासाचा सखोल आढावा घेतला आहे. या प्रकरणाची अत्यंत पारदर्शक व निष्पक्ष चौकशी करून नराधम आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

या गुन्ह्याबाबत तीव्र दुःख व्यक्त करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, हे कृत्य अत्यंत निंदनीय असून या प्रकरणातील दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठिशी घातले जाणार नाही. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत संशयित तरुणाला यापूर्वीच ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास अत्यंत वेगाने सुरू आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) चालवला जावा, अशी विशेष विनंती आपण राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या दुर्दैवी घटनेतील पीडित कुटुंबाच्या दुःखात शासन संपूर्णपणे सहभागी असून त्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. लवकरच त्या स्वतः पिंपळवंडी येथे जाऊन पीडित कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेणार आहेत व त्यांचे सांत्वन करणार आहेत. या घटनेमुळे राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाचा वेगाने तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरू आहे.