क्राईम न्यूज.Pune - Lokprant

पुण्यात अमली पदार्थांवर मोठी कारवाई; कोंढव्यात ४३ जण पोलिसांच्या जाळ्यात
पुणे: पुणे शहरातील कोंढवा परिसरात अमली पदार्थांच्या अवैध विक्री विरुद्ध अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने (ANTF) अत्यंत धडक आणि मोठी कारवाई केली आहे. पहाटेच्या सुमारास टाकलेल्या या अचानक छाप्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांसमोरच सुरू असलेल्या या अवैध धंद्यावर वेशांतर करून सापळा रचण्यात आला, ज्यामध्ये गांजा विकणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांसह चक्क अमली पदार्थ विकत घेण्यासाठी आलेल्या तब्बल ४३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी मोठा मुद्देमाल जप्त करत एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, कोंढवा परिसरातील काकडे वस्तीमधील शिवनेरी गल्लीत दर्ग्याजवळ काही व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या महाराष्ट्राच्या पुणे पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्धरीत्या पहाटेच्या वेळी त्या परिसरात सापळा रचला. पोलिसांच्या पथकाने वेशांतर करून या कारवाईत सहभाग घेतला होता. या ठिकाणी अजु अहमद शेख (रा. कोंढवा) आणि गणेश सिद्धु पाटोळे (रा. बुद्धविहार सोसायटी, कोंढवा) हे दोन सराईत गुन्हेगार गांजा विक्रीसाठी आले होते. पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्याकडे तब्बल ३ किलो गांजा आढळून आला, जो पोलिसांनी तात्काळ जप्त केला.

विशेष म्हणजे, हे दोघे आरोपी ५०० आणि १ हजार रुपयांच्या मोबदल्यात गांजाची विक्री करत होते. पहाटे पासूनच विविध ठिकाणांहून अनेक तरुण हा गांजा विकत घेण्यासाठी त्या ठिकाणी येत होते. ग्राहक जसे गांजाची मागणी करत होते, तसे पोलीस त्यांना बाजूला घेऊन ताब्यात घेत होते. अशा प्रकारे एकापाठोपाठ एक तब्बल ४३ जण गांजा विकत घेण्यासाठी आल्याचे उघडकीस आले असून, पोलिसांनी त्या सर्वांना तिथेच रंगेहाथ ताब्यात घेतले. चौकशीत असे समोर आले की, मुख्य आरोपी अजु शेख याच्याकडे गणेश पाटोळे हा अवघ्या ५०० रुपये पगारावर कामाला होता. या दोघांवर यापूर्वीही एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत दोन गंभीर गुन्हे दाखल असून, त्यात गांजा बाळगल्याच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे.

या धडक कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून ३ किलो गांजा सोबतच १४ दुचाकी व तीनचाकी वाहने, ३५ मोबाईल संच आणि २६ हजार ९६० रुपयांची रोकड असा एकूण मोठा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही यशस्वी कारवाई महाराष्ट्र राज्य अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पुणे पथकाचे प्रमुख ज्योतिप्रिया सिंह, पोलीस उपमहानिरीक्षक प्रविण पाटील, पोलीस उपायुक्त अनुज तारे, पोलीस उपअधीक्षक नंदिनी वग्यानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष सरवदे, सहायक फौजदार तुपे, पोलीस हवालदार कळसकर, तसेच पोलीस अंमलदार ढेभे, साबळे आणि होळकर यांच्या पथकाने पार पाडली. कोंढव्या सारख्या दाट लोकवस्तीच्या भागात अशा प्रकारे ड्रग्स विक्रीचा गोरखधंदा चालत असल्यामुळे नागरिक आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पुण्यात घरातून बेकायदा दारूविक्री; गुन्हे शाखेची धडक कारवाई
पुणे: पुणे शहरात प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून मानवी वस्तीत आणि राहत्या घरात बेकायदेशीर पणे देशी-विदेशी दारूचा साठा करून तिची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या एका अवैध धंद्याचा गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने पर्दाफाश केला आहे. सिंहगड रोड परिसरातील हिंगणे खुर्द येथील साईनगर भागात अचानक छापा टाकून पोलिसांनी तब्बल १ लाख २४ हजार ६३५ रुपयांच्या देशी व विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आली असून, या धडक कारवाईमुळे शहरात विनापरवाना मद्यविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

अंकितकुमार सूरजन बिंद (वय २०, रा. साईनगर, हिंगणे खुर्द, सिंहगड रोड) आणि आदित्य राजू शिंदे (रा. शंकर मंदिराजवळ, जनता वसाहत) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेचे युनिट ३ चे पथक नेहमी प्रमाणे सिंहगड रोड परिसरात गस्त घालत असताना, हिंगणे खुर्दधील साई नगरमध्ये राहणाऱ्या अंकित कुमार बिंद याने आपल्या स्वतःच्या घरात बेकायदेशीर पणे मद्याचा साठा करून तो ग्राहकांना चढ्या भावाने विकत असल्याची गुप्त माहिती पोलीस अंमलदार पंढरीनाथ शिंदे आणि काटकर यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने तत्काळ संबंधित घरावर छापा टाकला.

पोलिसांनी घरात झडती घेतली असता तेथे मोठ्या प्रमाणावर विविध ब्रँडच्या देशी आणि विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी सुमारे १ लाख २४ हजार रुपयांचा हा संपूर्ण मद्यसाठा जप्त करून अंकित कुमार बिंद याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपला मित्र आदित्य शिंदे याच्या सोबत मिळून हा अवैध मद्यविक्रीचा व्यवसाय भागीदारीत चालवत असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ दुसऱ्या आरोपीलाही बेड्या ठोकल्या आणि दोघांना पुढील कायदेशीर कारवाई साठी सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. ही यशस्वी कारवाई उच्च पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली असून, अशा प्रकारे घरगुती स्वरूपात चालणाऱ्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.