एआरएआय टेकडी - Lokprant

कोथरूडमध्ये स्टेटसवरून वाद पेटला; १७ वर्षीय युवकाची हत्या, पुण्यात खळबळ
पुणे: पुणे शहरातील कोथ्रुड परिसरात एका अत्यंत क्षुल्लक कारणावरून घडलेल्या खुनाच्या थरारक घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आपण एकाच वस्तीत राहत असताना विरोधकांचे व्हॉट्सअप स्टेटस का ठेवले, या किरकोळ कारणावरून दोन अल्पवयीन मुलांनी एका १७ वर्षीय युवकाच्या डोक्यात हातोडीने निर्दयीपणे वार करून त्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोथ्रुड पोलिसांनी तातडीची कारवाई करत दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

नील विजय नाईक (वय १७, रा. श्रावणधारा, कोथ्रुड) असे खून झालेल्या दुर्दैवी तरूण मुलाचे नाव आहे. प्राप्त माहिती नुसार, मंगळवारी सकाळी नेहमी प्रमाणे एआरएआय (ARAI) टेकडीवर फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना जंगलात एका युवकाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह निदर्शनास आला. डोक्यात गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट दिसल्याने नागरिकांनी तातडीने याबाबत कोथरूड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृताची ओळख पटवली असता तो नील विजय नाईक असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, मृत नील नाईक आणि आरोपी असणारे दोघेही अल्पवयीन मुलगे एकाच परिसतात राहणारे आहेत. यापूर्वी आरोपींचा व अन्य काही मुलांसोबत वाद झाला होता आणि त्या वादातील ती मुले सध्या कारागृहात आहेत. नील नाईक याची त्या मुलांसोबत ओळख असल्यामुळे त्याने त्यांच्यापैकी एकाचे फोटो किंवा माहिती आपल्या मोबाईलच्या व्हॉट्सअपवर स्टेटस म्हणून ठेवली होती. हीच गोष्ट आरोपींच्या जिव्हारी लागली. "आपण एकाच वस्तीत राहणारे असताना, ज्यांनी आम्हाला मारहाण केली आणि जे आता जेलमध्ये आहेत, त्यांचे स्टेटस तू का ठेवतोस?" असा जाब विचारत त्यांनी नीलसोबत वाद घातला.

हा वाद सुरुवातीला मिटल्या सारखा भासवून आरोपींनी मंगळवारी रात्री नीलला विश्वासात घेतले आणि फिरण्याच्या बहाण्याने एआरएआय टेकडीवरील निर्जन जंगलात नेले. तिथे पूर्व नियोजित बेतात किंवा संतापाच्या भरात त्यांनी सोबत आणलेल्या हातोडीने नीलच्या डोक्यात सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी होऊन नीलचा जागीच मृत्यू झाला. घटनेची गांभीर्य लक्षात घेत कोथरूड  पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत दोन्ही अल्पवयीन आरोपींना अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलांमध्ये वाढणारी हिंसक प्रवृत्ती आणि क्षुल्लक कारणावरून टोकाचे पाऊल उचलण्याच्या या प्रकारामुळे पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.