- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- अपघातानंतर रेल्वे प्रशासनाला जाग ; लोकलला करणार ऍटोमॅटिक डोअर क्लोजर सिस्टीम
अपघातानंतर रेल्वे प्रशासनाला जाग ; लोकलला करणार ऍटोमॅटिक डोअर क्लोजर सिस्टीम

सकाळी मुंब्रा ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या अपघातात 13 प्रवासी खाली पडले होते त्यातील 4 प्रवाशांचा मृत्यू झाला असून काही लोकांना आपले हात पाय गमवावे लागले आहेत. रेल्वे ट्रॅक च्या तीव्र वळणावर दोन लोकल जवळून जाताना प्रवासी एकमेकांना घासले गेल्याने खाली पडून त्यांचा मृत्यू झाला. लोकलच्या फूट बोर्ड वर लटकून प्रवास केल्या न प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे.
जखमींचा वैद्यकीय खर्च शासन करणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. तसेच मृत्यांच्या वारसांना 5 लाखाची मदत जाहीर केली आहे. रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सिद्धेश देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्दीच्या वेळी लोकल मधील प्रवशांची संख्या 6 हजार वर जाते. त्यामुळे त्यावर उपाय योजना करण्यासाठी यापूर्वीच पत्र देण्यात आले होते. प्रशासनाला पत्र देणाऱ्या तरुणाला देखील या अपघातात आपले पाय गमवावे लागले आहेत.
महत्वाचे 6 मुद्दे

▫️मुंबईत लोकल ट्रेन च्या सरासरी 7 प्रवाशांचा रोज मृत्यू
▫️ मध्य रेल्वे वर 2009 ते 2024 पर्यंत 19321 जणांचा मृत्यू
▫️ कल्याण ठाणे वसई आणि बोरिवलीत सर्वाधिक मृत्यू ची नोंद
▫️पश्चिम रेल्वे वर 1394 फेऱ्यामध्ये 35 लाख प्रवाशांचा प्रवास.
▫️मध्य रेल्वे वर 1810 फेऱ्यात 40 लाख प्रवाशांचा प्रवास
मध्य रेल्वेच्या सीपीआरओंच्या नवीन निर्णयावर सरकारचा आक्षेप
मध्य रेल्वेच्या सीपीआरओ स्वप्नील निला यांनी दिलेल्या माहिती नुसार, नवीन लोकल या मेट्रो रेल्वे सारख्या असतील. त्या ऍटोमॅटिक डोअर क्लोजर सिस्टिम सोबत असतील.या निर्णयावर मनसे चे राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी ऍटोमॅटिक डोअर्स असतील तर प्रवासी रेल्वे मधेच गुदमरून मरतील असे म्हणत आक्षेप घेतला आहे.

खबरें और भी हैं
१७ वर्षीय तरुणीचा विहिरीत पडून मृत्यू
राज्यातील पहिल्या महसूल लोक अदालतीचे उद्घाटन
पुष्पक रेल्वेतून पडून 5 जणांचा मृत्यू
