- Hindi News
- पुणे
- महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा उघडकीस ; पुण्यातील व्यवसायिकाने शासनालाच घातला गंडा
महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा उघडकीस ; पुण्यातील व्यवसायिकाने शासनालाच घातला गंडा

शासकीय योजनांचा लाभ घेऊन शासनाचीच फसवणूक व्यापारी कशा प्रकारे करतात त्याची एक घटना समोर आली आहे. पुण्यातील एका व्यापाऱ्याने बनावट कागदपत्र तयार करून आणि अस्तित्वात नसलेला कारखाना दाखवून शासकीय योजनांचा फायदा घेऊन शासनाची मोठी फसवणूक केली आहे. धुळे जिल्ह्यातील नरडाणा एमआयडीसी मध्ये हा प्रकार घडला असून व्यापाऱ्याने नरडाणा एमआयडीसी मधील एक भूखंड तारण ठेवून कोट्यवधी रुपयांचं कर्ज घेतले यासाठी सर्व बनावट कागदपत्रे तयार केली. या प्रकरणी 31 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका व्यावसायिकाने शासनाकडून धुळे जिल्ह्यातील नरडाणा एम आय डी सी मध्ये 12 एकरचा भूखंड घेतला. बँकेचे अधिकारी, प्रॉपर्टी ब्रोकर, शासनाचे अधिकारी यांना हाताशी धरून या उद्योजकाने या 12 एकर भूखंडाला बँकेत तारण ठेवले व तब्बल 11 कोटींपेक्षा अधिक कर्ज मंजूर करून घेतले. या जमिनीवर मोठा उद्योग उभा राहून सर्वांना रोजगार मिळतील असे वाटत असतानाच या व्यवसायिकाने शासनाला पद्धतशीरपणे गंडा घालण्याचा प्लॅन अखला होता. परंतु माहिती अधिकार कार्यकर्ते एडव्होकेट कृष्णा मोरे यांनी शिंदखेडा न्यायालयात धाव घेतली त्यानंतर न्यायालयाने आदेश दिल्यानंतर पोलिसांनी 31 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये घोटाळेबाज बँक मॅनेजर, उद्योग विभागाचे अधिकारी यांच्या संगनमताने शासनाच्या कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. बँक आणि पुण्यातील उद्योजक यांनी तब्बल चारशे किलोमीटर लांब धुळे जिल्ह्यातील नरडाणा एमआयडीसी मध्ये जागा घेतली. व बनावट कागदपत्रे तयार करून त्यावरील सबसिडी आपल्या घशात घालण्याचा प्रयत्न केला. परंतू माहिती अधिकारी कृष्णा मोरे यांनी हे प्रकरण उघडकीस आणले. शासन आता यावर काय निर्णय घेईल अशा प्रकारच्या अनेक बनवट बोगस उद्योजकांचा शोध घेईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खबरें और भी हैं
सेतू कार्यालयातील सर्व्हर डाउनमुळे नागरिक संतप्त
नऱ्हे येथे एका सराईताने पेटवल्या 7 गाड्या
पर्यटनस्थळ परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
डॉ. नितीन अभिवंत यांचे ट्रेकिंग दरम्यान निधन
