- Hindi News
- पुणे
- FC रोडवरील विक्रेत्यांना खंडणी साठी धमकी; कथित लेडी डॉन हिना शेखकडे पोलिसांचे दुर्लक्ष
FC रोडवरील विक्रेत्यांना खंडणी साठी धमकी; कथित लेडी डॉन हिना शेखकडे पोलिसांचे दुर्लक्ष

पुण्यातील एफसी रोड वर गेल्या काही दिवसांपासून, कथित लेडी डॉन हिना शेख आणि तिच्या टोळीतील सदस्य, शोएब जमादार आणि शोएब पटेल हे रस्त्यावरील विक्रेत्यांना खंडणी साठी त्रास देत आहेत. एका विक्रेत्याकडून त्याला धमकी देऊन 3 ते 4 हजार रुपयांची वसुली केली आहे. विक्रेत्यांनी व्यवसाय करण्यासाठी तिला पैसे द्यावे लागतील असे सांगून ती पैशाची मागणी करते. जेव्हा विक्रेत्याने त्याच्याकडे पैसे नसल्याचे सांगितले तेव्हा हिना शेखने त्याचे सामान रस्त्यावर फेकून त्याच्या अल्पवयीन भावाला मारहाण केली. सततच्या धमक्या व पैशांची मागणी यामुळे यापूर्वीही संबंधित विक्रेत्याने हिना शेख आणि तिच्या टोळीविरुद्ध डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तथापि, मारहाणीनंतर, जेव्हा विक्रेता गुन्ह्याची तक्रार करण्यासाठी आणि न्याय मागण्यासाठी गेला तेव्हा पोलीस स्टेशन मधून त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तसेच डेक्कन पोलिसांनी याची दखल न घेता त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

खबरें और भी हैं
१७ वर्षीय तरुणीचा विहिरीत पडून मृत्यू
राज्यातील पहिल्या महसूल लोक अदालतीचे उद्घाटन
पुष्पक रेल्वेतून पडून 5 जणांचा मृत्यू
