- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- राज्यात आजही पावसाचा जोर कायम राहणार ; कोकण कोल्हापूर, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता
राज्यात आजही पावसाचा जोर कायम राहणार ; कोकण कोल्हापूर, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता
By Lokprant
On

राज्यातील अनेक भागांत पुढील चार दिवस पाऊस सक्रीय असणार आहे. हवामान विभागाने अनेक ठिकाणी यलो अलर्ट तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. राज्यातील अनेक भागांत पाऊस सक्रीय झाला आहे. कोकण, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईतील अनेक भागांत पाऊस सुरु आहे. शुक्रवारी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह मुंबई, ठाणे येथे मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यातील अनेक भागांत पुढील चार दिवस पाऊस सक्रीय असणार आहे. हवामान विभागाने अनेक ठिकाणी यलो अलर्ट तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात पुढील चार दिवस पाऊस सक्रीय असणार आहे. मराठवाड्यात पुढील चार दिवस मध्यम पावसाचा अंदाज आहे. कोकणातील दोन जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा आँरेंज अलर्ट आहे.
Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

Latest News
06 Jul 2025 19:37:51
मलवडी (ता. माण )येथे श्री शांतिगिरीजी महाराज आश्रम या ठिकाणी, गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात पार पडला. हजारो