- Hindi News
- सातारा
- महंत शांतिगिरीजी महाराजांच्या आशीर्वादासाठी हजारोंचा जनसागर; गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मलवडीत कार्...
महंत शांतिगिरीजी महाराजांच्या आशीर्वादासाठी हजारोंचा जनसागर; गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मलवडीत कार्यक्रमाचे आयोजन
By Lokprant
On

मलवडी (ता. माण )येथे श्री शांतिगिरीजी महाराज आश्रम या ठिकाणी, गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात पार पडला. हजारो भाविकांनी बाबाजींचे दर्शन घेऊन गुरुपौर्णिमेचा महिमा अनुभवला.
या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. सुरुवातीला आदरणीय बाबाजींचे आशीर्वचन झाले .ज्यामध्ये ते म्हणाले की, "भारतीय संस्कृती घराघरात पोहोचली पाहिजे ; नव्हे तर ती रुजली पाहिजे .अहंभावना सोडून 'दास' बनून राहण्याची वृत्ती अंगीकारली पाहिजे ." यानंतर गुरुमाऊलींची पाद्यपूजा व महाआरती पार पडली. भक्तांनी दर्शनाचा तसेच महाप्रसादाचा यथावकाश लाभ घेतला. या कार्यक्रमास श्री पंच दशनाम जुना आखाड्याचे संत - महंत तसेच विश्व हिंदू परिषद( महाराष्ट्र, गुजरात, गोवा) येथून आलेले गोरक्षक अधिकारी माननीय श्री. भाऊराव कुदळे उपस्थित होते.
श्री शांतिगिरी जी महाराज जनसेवा प्रतिष्ठान मलवडीतर्फे सर्व भाविकांसाठी भोजन, निवास, आरोग्य आणि पाण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. स्वयंसेवकांनी वाहतूक आणि दर्शन व्यवस्थेसाठी विशेष मेहनत घेतली. उत्सव शांततेत आणि भक्तीभावाने संपन्न झाला. भक्तांचे समाधान व भक्तीरसाने परिपूर्ण वातावरण हे गुरुपौर्णिमेच्या उत्सवाचे खरे यश ठरले.
Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

Latest News
06 Jul 2025 19:37:51
मलवडी (ता. माण )येथे श्री शांतिगिरीजी महाराज आश्रम या ठिकाणी, गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात पार पडला. हजारो