- Hindi News
- सातारा
- पिंगळी बुद्रुक सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी मनीषा फडतरे
पिंगळी बुद्रुक सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी मनीषा फडतरे
By Lokprant
On

पिंगळी बुद्रुक तालुका माण येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी च्या चेअरमन पदी सौ. मनिषा गोरखनाथ फडतरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विकास सेवा सोसायटी च्या इतिहासात प्रथमच महिला चेअरमन होण्याचा सन्मान मनिषा फडतरे यांना मिळाला. चेअरमन मनिषा फडतरे या केंद्रप्रमुख साहेबराव फडतरे यांच्या सुनबाई आहेत. तसेच दहिवडी येथील डॉ कर्णे यांच्या हॉस्पिटल समोर असलेल्या सुप्रिया मेडिकल चे मालक गोरखनाथ फडतरे यांच्या पत्नी आहेत.
एका महिलेची सोसायटी चेअरमन पदी झालेली निवड ही माण तालुक्यात कौतुकाचा विषय झाला असून सर्वत्र त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.सौ. मनिषा गोरखनाथ फडतरे यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे (आबा), दहिवडी येथील प्रसिद्ध डॉक्टर अजय कर्णे, डॉ प्रदीप पालवे, डॉ. अनिल बोराटे, डॉ. संजय डोंबे, नगरसेवक सुरेंद्र मोरे, गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे, दीपक ढोक, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वसुधा कर्णे, यांच्यासह माण मेडिकल असोसिएशन व पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी, तसेच सर्व संचालक मंडळाने भेटून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पिंगळी बुद्रुक येथे विकास सेवा सोसायटी च्या कार्यालयात निवड प्रक्रिया झाल्यानंतर सरपंच श्रीकांत जगदाळे, चेअरमन सचिन जगदाळे, शहाजी जगदाळे, उद्योजक राजू जगदाळे, सरपंच वसंत सजगणे, महादेव कोकरे, अर्जुन जगदाळे, जीतू तुपे, अनिल सत्रे, तानाजी फडतरे, सयाजी फडतरे, भास्कर फडतरे धनाजी जाधव, रामभाऊ जाधव, पांच्या सह उपस्थित मान्यवरांनी व ग्रामस्थानी अभिनंदन केले.
Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

Latest News
06 Jul 2025 19:37:51
मलवडी (ता. माण )येथे श्री शांतिगिरीजी महाराज आश्रम या ठिकाणी, गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात पार पडला. हजारो