माण तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर ; पिंगळी बुद्रुक, मलवडी, भांडवलीत सर्वसाधारण महिला

   माण तालुक्यातील बिगर अनुसुचित क्षेत्रातील सर्व ९५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत शुक्रवार ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता तहसील  कार्यालय दहिवडी येथील बैठकीत पार पडली. गोंदवले बुद्रुक, उकिर्डे, पानवण, बिदाल, धामणी महिमानगड येथे ना.म.प्र. स्त्री हे आरक्षण पडले तर मलवडी, वावरहिरे, भांडवली मध्ये सर्वसाधारण महिला हा बदल झालेला आहे.
       माण तालुक्यातील एकूण ९५ ग्रामपंचायतीच्या सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठीचे सरपंच पदाचे आरक्षण आळीपाळीने (चक्रानुक्रमे) पध्दतीने जाहीर करण्यात आले. यावेळी निरीक्षण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, तहसीलदार विकास अहिर, नायब तहसीलदार योगिता ढोले व श्रीकांत शेंडे, आदी अधिकारी व गावोगावचे नेते तसेच सरपंच पदासाठीचे इच्छुक उपस्थित होते. बहुतांशी आरक्षण थेट जाहीर करण्यात आले तर काही ठिकाणी चिठ्ठीचा वापर करण्यात आला.
 
आरक्षण व ग्रामपंचायतीचे नाव पुढीलप्रमाणे
 
सर्वसाधारण स्त्री : वडजल, लोधवडे, वरकुटे - मलवडी, ढाकणी, शिंदी खुर्द, पर्यंती, श्रीपालवन, कुकुडवाड (आगासवाडी), रांजणी, मार्डी, आंधळी, मोगराळे, खुटबाव, वळई, पुळकोटी, वडगाव, जाशी, शिरवली, वरकुटे - म्हसवड, बोडके, पांढरवाडी, चिलारवाडी, कारखेल, देवापुर, पिंगळी बुद्रुक, भांडवली, मलवडी, वावरहिरे
 
सर्वसाधारण : भालवडी, हिंगणी, शिंगणापूर, पिंपरी, पळशी, बिजवडी, नरवणे, राजवडी, धुळदेव, गंगोती, जांभूळणी, थदाळे, किरकसाल, , महाबळेश्वरवाडी, बोथे, कुरणेवाडी, भाटकी, कोळेवाडी, सत्रेवाडी, कासारवाडी, अनभुलेवाडी, मनकर्णवाडी, दोरगेवाडी, दिडवाघवाडी, पुकळेवाडी, पांगरी, सोकासन व शेनवडी
 
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री : गोंदवले बुद्रुक, उकिर्डे, पानवन, पाचवड, बिदाल, मोही (डंगिरेवाडी), तोंडले, महीमानगड,  धामणी, वारुगड (गरडाचीवाडी-खंड्याचीवाडी-उगळ्याचीवाडी), टाकेवाडी, वाघमोडेवाडी व येळेवाडी
 
नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण :  कुळकजाई, शिंदी बुद्रुक, दिवड, शेवरी, विरळी, इंजबाव, पळसावडे, काळचौंडी, , सुरुपखानवाडी, खडकी, परकंदी, घेरेवाडी (हस्तीनापूर) व बनगरवाडी
 
अनुसूचित जाती स्त्री : वाकी, शिरताव, राणंद, संभुखेड, पिगंळी खुर्द, दिवडी व काळेवाडी (नरवणे)
 
अनुसूचित जाती सर्वसाधारण : गोंदवले खुर्द, हवालदारवाडी, डंगिरेवाडी (थदाळे), गटेवाडी, दानवलेवाडी व जाधववाडी
Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

महंत शांतिगिरीजी महाराजांच्या आशीर्वादासाठी हजारोंचा जनसागर; गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मलवडीत कार्यक्रमाचे आयोजन

Latest News

महंत शांतिगिरीजी महाराजांच्या आशीर्वादासाठी हजारोंचा जनसागर; गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मलवडीत कार्यक्रमाचे आयोजन महंत शांतिगिरीजी महाराजांच्या आशीर्वादासाठी हजारोंचा जनसागर; गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मलवडीत कार्यक्रमाचे आयोजन
  मलवडी (ता. माण )येथे श्री शांतिगिरीजी महाराज आश्रम या ठिकाणी, गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात पार पडला. हजारो
ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी मध्ये पालखी सोहळा थाटामाटात संपन्न
पिंगळी बुद्रुक सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी मनीषा फडतरे
सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग विभागाचे  भारताच्या सकल उत्पन्नात महत्वपूर्ण योगदान - केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी
विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत' योजनेद्वारे  ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला लाभ - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software