- Hindi News
- पुणे
- ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी मध्ये पालखी सोहळा थाटामाटात संपन्न
ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी मध्ये पालखी सोहळा थाटामाटात संपन्न

पुणे: आपला महाराष्ट्र संताची भूमी म्हणून ओळखला जातो याच भूमीमध्ये पुणे शहरात ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी मध्ये पालखी सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.पालखी सोहळा संपन्न करण्यासाठी ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सागर ढोले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पाडला. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती माजी आमदार कमलताई ढोले पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.विद्यार्थ्यांनी वारकरी पोषाख परिधान करून उपस्थितांचे लक्ष्य वेधले.अनादी अनंत काळापासून चालत आलेली परंपरा या परंपरेला समानतेचा एकात्मतेचा संदेश मूल्य जोपासत सोहळ्याला सर्व लहान थोर मंडळी, विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पालखी सोहळ्यात स्कूल फॉर एक्सलन्स, ढोले पाटील ज्युनिअर कॉलेज आर्ट कॉमर्स सायन्स व अभियांत्रिकी महाविद्यालय या सर्व विद्यार्थी व प्राध्यापक कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.

खबरें और भी हैं
