मालमत्ता खरेदी-विक्रीवेळी भरले जाणारे मुद्रांक शुल्क स्थानिक विकासासाठी वापरण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई: राज्यातील मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवेळी भरले जाणारे मुद्रांक शुल्क स्थानिक विकासासाठी वापरण्याबाबत मुख्यमंत्री व वित्तमंत्री यांच्या समवेत बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.सदस्य रणधीर सावरकर यांनी याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावेळी सदस्य भास्कर जाधव यांनी चर्चेत सहभाग घेतला.

      महसूल मंत्री  बावनकुळे म्हणाले, सद्यःस्थितीत मालमत्ता नोंदणीदरम्यान वसूल होणाऱ्या मुद्रांक शुल्कातून एक टक्का रक्कम शासनाच्या एकत्रित निधीत जमा केली जाते. ही रक्कम थेट संबंधित महापालिका, नगरपालिका किंवा ग्रामपंचायतींना तत्काळ वितरित व्हावी यासाठी कार्यपद्धती तयार करण्यात येईल. आगामी अर्थसंकल्पात या प्रलंबित निधीबाबत तरतूद करण्याबाबत वित्तमंत्र्यांकडे मागणी करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

महंत शांतिगिरीजी महाराजांच्या आशीर्वादासाठी हजारोंचा जनसागर; गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मलवडीत कार्यक्रमाचे आयोजन

Latest News

महंत शांतिगिरीजी महाराजांच्या आशीर्वादासाठी हजारोंचा जनसागर; गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मलवडीत कार्यक्रमाचे आयोजन महंत शांतिगिरीजी महाराजांच्या आशीर्वादासाठी हजारोंचा जनसागर; गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मलवडीत कार्यक्रमाचे आयोजन
  मलवडी (ता. माण )येथे श्री शांतिगिरीजी महाराज आश्रम या ठिकाणी, गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात पार पडला. हजारो
ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी मध्ये पालखी सोहळा थाटामाटात संपन्न
पिंगळी बुद्रुक सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी मनीषा फडतरे
सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग विभागाचे  भारताच्या सकल उत्पन्नात महत्वपूर्ण योगदान - केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी
विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत' योजनेद्वारे  ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला लाभ - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software