- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- गुणवंत शिक्षक पुरस्कार मोहन पवार यांना प्रदान
गुणवंत शिक्षक पुरस्कार मोहन पवार यांना प्रदान
By Lokprant
On

शिराळा ता.जिल्हा परिषद शाळा तडवळेचे उपशिक्षक मोहन पवार यांना सन २०२४-२५ चा उपक्रमशील व गुणवंत शिक्षक म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मोरणा फाउंडेशनच्यावतीने अध्यक्षा सविता पाटील, उपाध्यक्ष राहुल पाटील, संचालक सचिन पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मोरणा फाउंडेशनचे संचालक गोरख पाटील, सचिन मोहिते, सचिव सुनिता पाटील, सुरेश पाटील, हणमंत पाटील उपस्थित होते. यावेळी तडवळे हायस्कूलचे मुख्याध्यापक हिंदुराव ताटे व विविध स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
Edited By: Lokprant


Latest News
05 Jul 2025 22:18:22
पुणे: आपला महाराष्ट्र संताची भूमी म्हणून ओळखला जातो याच भूमीमध्ये पुणे शहरात ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी मध्ये पालखी सोहळा मोठ्या...