WhatsApp येणार नव्या फिचर सोबत; चॅटिंग करता येईल आता मोबाईल नंबर शिवाय

     चॅटिंग साठी जगभरात अब्जावधी लोक व्हॉट्सअप या मेसेजिंग ऍप चा वापर करतात. व्हॉट्सअप नेहमी कोणत्या तरी वेगळ्या फिचर सोबत येत असते. परंतू यावेळी मेसेजकर्त्यांना अजून सोयीस्कर फिचर मिळणार आहे. युजर्सना आता वॉट्सअप वर चॅटिंगसाठी आपला फोन नंबर शेअर करण्याची गरज राहणार नाही. वापरकर्ते  स्वतःचा एक युजरनेम तयार करू शकतील आणि या युजरनेमच्या आधारे इतर लोकांशी संपर्क साधू शकतील. आता चॅटिंग साठी मोबाईल नं शेअर करण्याची गरज भासणार नाही. हे इंस्टाग्राम सारखे हॅन्डल करता येणार आहे.WABetaInfo या विश्वासार्ह तंत्रज्ञान संकेतस्थळानुसार, WhatsApp च्या बीटा व्हर्जन 2.24.18.2 मध्ये हे फीचर आढळून आलं आहे. WhatsApp कडून याआधी वेगवेगळे फिचर्स देण्यात आले होते. वापरकर्त्यांच्या प्रायव्हसी साठी चॅट लॉक, डिसअपीयरिंग मेसेजेस इत्यादी फिचर्स देण्यात आले होते आता या नव्या फिचर मुळे युजर्सना खासगी माहिती जपता येणारं टूल ठरणार आहे.
 काय असणार आहे खास?
1.अनोळखी लोकांशी कनेक्ट होण्यासाठी अधिक सुरक्षित पर्याय
2.इंस्टाग्रामसारखं सर्च-आधारित कनेक्शन
3.युजर्स फोन नंबरशिवाय मेसेज करू शकणार
4.प्रत्येक युजरला स्वतःचा युजरनेम तयार करता येईल
5.ग्रुप चॅटमध्ये ओळख लपवण्यासाठी उपयुक्त
  याची   अधिकृत लाँचिंग डेट जाहीर झालेली नाही या WhatsApp feacher च्या बीटा चाचण्या सुरू झाल्यामुळे पुढील काही आठवड्यांमध्ये हे फीचर सर्वांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

महंत शांतिगिरीजी महाराजांच्या आशीर्वादासाठी हजारोंचा जनसागर; गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मलवडीत कार्यक्रमाचे आयोजन

Latest News

महंत शांतिगिरीजी महाराजांच्या आशीर्वादासाठी हजारोंचा जनसागर; गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मलवडीत कार्यक्रमाचे आयोजन महंत शांतिगिरीजी महाराजांच्या आशीर्वादासाठी हजारोंचा जनसागर; गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मलवडीत कार्यक्रमाचे आयोजन
  मलवडी (ता. माण )येथे श्री शांतिगिरीजी महाराज आश्रम या ठिकाणी, गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात पार पडला. हजारो
ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी मध्ये पालखी सोहळा थाटामाटात संपन्न
पिंगळी बुद्रुक सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी मनीषा फडतरे
सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग विभागाचे  भारताच्या सकल उत्पन्नात महत्वपूर्ण योगदान - केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी
विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत' योजनेद्वारे  ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला लाभ - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software