- Hindi News
- राष्ट्र
- भारतात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी बद्दल नवीन खुलासे समोर ;आरोपी रवी वर्माला न्यायालयात हजर करणार
भारतात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी बद्दल नवीन खुलासे समोर ;आरोपी रवी वर्माला न्यायालयात हजर करणार

भारतामध्ये राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र एटीएसला आता तपासामधून अनेक धक्कादायक असे खुलासे झालेले आहेत. पाकिस्तानच्या महिला एजंट्सनी आरोपी रवी वर्माला हनी ट्रॅप मध्ये अडकवण्यासाठी भारतीय सिम कार्डचा वापर केला होता. रवी वर्माला पाकिस्तानी एजंट सोबत गुप्त माहिती शेअर करण्याच्या बदल्यात नऊ हजार रुपये देण्यात आले होते अस ही तपासमधून समोर आलं आहे. हे पैसे इनॅक्टिव्ह अकाउंट्स मधून वेगवेगळ्या बँक खात्या मध्ये ट्रांसफर करण्यात आले. ज्याचं विश्लेषण अजूनही सुरू आहे महिला एजंटनी वर्मा कडून युद्ध नौका आणि पाणबुड्यांविषयीची संवेदनशील संरक्षण विषयीची माहिती फोटो आणि व्हिडिओ सुद्धा मागवून घेतले होते. तर भारतामध्ये राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ठाण्यामधील आरोपी रवी वर्मा याची पोलीस कोठडी आज संपत आहे आणि आज ठाणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये ठाणे एटीएसची टीम आरोपी रवी याला घेऊन दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास हजर करणार आहे.

खबरें और भी हैं
