नऱ्हे येथे एका सराईताने पेटवल्या 7 गाड्या

       पुण्यात गुन्ह्यांची संख्या वाढत असताना त्यातच
नऱ्हे भागातुन एका सोसायटीच्या आवारातुन सात दुचाकी पेटवून देण्याची घटना घडली आहे. आरोपी दुचाकी  पेटवून  पसार झाला होता. या सराइताला गुन्हे शाखेने अटक केली आहे.
सिद्धेश नितीन धुमाळ (२३, रा. घोरपडी पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याचबरोबर त्याच्या सोबत एका अल्पवयीन व्यक्तीस ताब्यात घेतले आहे.
             मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धेश हा नऱ्हे येथील सिद्धेश्वर प्लाझा येथे राहणाऱ्या त्याच्या मित्रा सोबत बाहेर फिरायला गेला होता. मंगळवारी रात्री सिद्धेश ने मित्राला घरी सोडायला सांगितले यावरून त्या दोघांच्यात वाद झाला. त्यानंतर सिद्धेश व त्याच्या अल्पवयीन मित्र मध्यरात्री सोसायटीत येऊन तळमजल्यावरील मित्राच्या बाईक वर पेट्रोल ओतून ती पेटवली. त्या बाईक च्या बाजूला असणाऱ्या 6 दुचाकींनी पेट घेतला. याबाबत एकाने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

         गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने आरोपी सिद्धेश व त्याच्या मित्राला ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रंगराव पवार, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पंढरीनाथ शिंदे, अतुल साठे, अमित बोडरे, कैलास लिम्हण, किशोर दुशिंग, महेंद्र तुपसौंदर आणि चेतन शिरोळकर यांनी ही कामगिरी केली.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

विद्यावाणी कम्युनिटी रेडिओच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Latest News

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software