- Hindi News
- देश
- एअर इंडियाच्या विमानाचा उड्डाण घेताच अपघात
एअर इंडियाच्या विमानाचा उड्डाण घेताच अपघात

गुजरात मधील अहमदाबाद विमानतळावर मोठी दुर्घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी १:३८ वाजता अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्या नंतर 2 मिनिटांच्या कालावधीतच विमान खाली कोसळले. यामध्ये २४२ प्रवासी आणि 12 कर्मचाऱ्यांसह हे विमान लंडनला निघाले होते. एअर इंडियाचे विमान रहिवासी भागात मेघनी नगर येथे कोसळले. यामध्ये अनेक जण जखमी झाल्याची भीती आहे.
पोलिस नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहिती नुसार , एअर इंडियाचे फ्लाइट एआय १७१ हे लंडनला जात होते.एअर इंडियाचे हे विमान बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर ट्विन जेट होते. त्यात एकूण २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते. त्यांच्यासोबत पायलट इन कमांड सुमित सभरवाल आणि सह-पायलट क्लाईव्ह कुंदर होते.
कॅप्टन सुमित सभरवाल हे एलटीसीमध्ये ८,२०० तासांचा अनुभव असलेले आहेत. सह-वैमानिकाला ११०० तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. हे विमान धावपट्टी 23 वरून निघाले होते.रनवे २३ वरून निघाल्यानंतर लगेचच, विमान विमानतळाच्या परिघाबाहेर जमिनीवर कोसळले. प्रवाशांच्या यादीत माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे देखील नाव आहे. यामध्ये 169 भारतीय, 1 कॅनाडा, पोर्तुगल 6 लोक, ब्रिटेन चे 52 प्रवासी होते. अपघाता नंतर विमानतळावरील सर्व सेवा बंद करण्यात आल्या. या अपघातात मोठ्या जीवितहानीची शक्यता वर्तवली जात असून बचावकार्य सुरु आहे