- Hindi News
- पुणे
- एस. एम. जोशी कॉलेजमध्ये उद्योजकता या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये उद्योजकता या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
By Lokprant
On

रयत शिक्षण संस्थेचे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील इनोव्हेशन फाउंडेशन, एस. एम. जोशी कॉलेज हडपसर आणि उच्च शिक्षण विभाग, रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने 'उद्योजकता' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डायरेक्टर जनरल एस.टी.पी. पुणे येथील सीईओ राजेंद्र जगदाळे व मैत्री फाउंडर सेलचे प्रमुख कमलेश पांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रयत शिक्षण संस्थेचे, चेअरमन चंद्रकांत दळवी (IAS., Retd.) हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे, सहसचिव प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे, सहसचिव (ऑडिट विभाग) प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे, चेअरमन चंद्रकांत दळवी (IAS., Retd.) म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेतील तीनही इन्व्हेंशन, इंनोव्हेशन अँड इन्क्यूबेशन सेंटर (CIII) उर्जित अवस्थेमध्ये आणलेले असून, संस्थेच्या सर्व महाविद्यालयांना या सेंटरच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण माहिती दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबर नाविन्यपूर्ण विचार देणे आवश्यक असून, ती काळाची गरज आहे. भविष्यामध्ये इन्व्हेंशन, इंनोव्हेशन अँड इन्क्यूबेशन (CIII) सेंटरच्या माध्यमातून जॉब देणारे विद्यार्थी तयार केले जातील. असे मत रयत शिक्षण संस्थेचे, चेअरमन चंद्रकांत दळवी (IAS., Retd.) यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मीबाई भाऊराव पाटील इनोव्हेशन फाउंडेशनचे सीईओ श्रीकांत कुंदन यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश साळुंखे यांनी तर कार्यक्रमाचे आभार उपप्राचार्य प्रो.डॉ.एकनाथ मुंढे यांनी केले. कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयातील प्राचार्य, संशोधन केंद्राचे प्रमुख व उद्योजकता विकास सेलचे प्रमुख बहुसंख्येने उपस्थित होते.
Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

Latest News
06 Jul 2025 19:37:51
मलवडी (ता. माण )येथे श्री शांतिगिरीजी महाराज आश्रम या ठिकाणी, गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात पार पडला. हजारो