BDP करिता आरक्षित क्षेत्रातील पर्यावरण संवर्धनासोबतच पुणेकरांचे संरक्षणाचे अनुषंगाने पुणे महापालिकेने ठोस पावले उचलावित – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे शहराच्या विकास आराखड्यांतर्गत बायोडायव्हर्सिटी डेव्हलपमेंट प्लॅन - BDP व हिलटॉप हिलस्लोप झोन मधील प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी आज विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत डोंगर माथा आणि डोंगरउतार अंतर्गत निश्चित करावयाचा बीडीपी झोन ,याबाबतच्या भूसंपादनातील समस्या, यातील अनाधिकृत बांधकामे, जनतेच्या प्राप्त तक्रारी व निवेदने यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. शासनाने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीने आरक्षणाची मुदत संपण्याआधी आपला अहवाल सादर करावा. यामध्ये स्थानिक आमदार, खासदार, इतर लोकप्रतिनिधी यांचे अभिप्राय घेण्यात यावेत तसेच पर्यावरणवादी संघटना व पर्यावरण तज्ञांच्या मतांचाही विचार करावा. यासाठी आरक्षित निर्मनुष्य क्षेत्रातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करावेत. तसेच माळीन, इर्शाळवाडी सारख्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जांभूळवाडी काळेवाडी सारख्या डोंगर उतारावरील अनधिकृत बांधकामे, प्रस्तावित बांधकामे यासाठी नियमावली तयार करावी व त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी अशी त्यांनी सूचना केली.

      बीडीपी क्षेत्रात येणाऱ्या आणि स्थलांतरित कराव्या लागणाऱ्या कुटुंबांच्या नुकसानभरपाई व पुनर्वसनाच्यामुद्द्यावर बोलताना,या कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी, तसेच लोकप्रतिनिधींनाही विश्वासात घेऊन या संदर्भातील निर्णय प्रक्रिया राबवली जावी, अशी सूचना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. यासंदर्भात समितीच्या शिफारशी राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार असून अंतिम निर्णय घेताना पर्यावरण संरक्षण आणि लोकभावना विचारात घेऊनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णय घेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

       बैठकीत शहरी वने (Urban Forest) या संकल्पनेवरही विशेष भर देण्यात आला. शहरी भागात पर्यावरण संवर्धनाकरिता वनसंपदा वाढविणे आणि स्थानिक भूधारकांना देखिल योग्य न्याय मिळेल या या दृष्टीने असे प्रकल्प राबविलेल्या महानगरपालिका/नगरपालिका यांच्या कार्याचा अभ्यास करावा अशा सूचना डॉ गो-हे यांनी दिल्या.या बैठकीस अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे,उपसचिव नगरविकास श्रीमती छापवाले,शहर अभियंता श्री प्रशांत वाघमारे,भूसंपादन अधिकारी श्रीमती श्वेता दारुणकर यांचेसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

बँकांनी आर्थिक साक्षरता मेळावे आयोजित करावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Latest News

बँकांनी आर्थिक साक्षरता मेळावे आयोजित करावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी बँकांनी आर्थिक साक्षरता मेळावे आयोजित करावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
पुणे: बदलत्या काळात नागरिकांची होणारी आर्थिक फसवणूक टाळण्याकरिता सायबर कक्षाची मदत घेवून कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र...
प्रशासकीय यंत्रणांद्वारे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती  अत्याचार प्रतिबंध अधिनियमाची  प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक - मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन
शिक्षणात गोंधळ!इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिकेलाच इंग्रजी येत नाही! पालक चिंतेत
शिंगणापूर रस्त्यावरील खड्डे बुझविण्यात ठेकेदाराचा कामचुकारपणा
लोकमान्य टिळकांचे पणतू, 'केसरी'चे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software