- Hindi News
- सातारा
- शिक्षणात गोंधळ!इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिकेलाच इंग्रजी येत नाही! पालक चिंतेत
शिक्षणात गोंधळ!इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिकेलाच इंग्रजी येत नाही! पालक चिंतेत
By Lokprant
On

इंग्लिश मेडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिकेने लावला इंग्लिश स्पिकिंग कोर्स
दहिवडी: ग्रामीण व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी शिक्षणाचा दीपस्तंभ ठरलेली माण तालुक्यातील नामांकित संस्थेमधील काही शाखा जाचक फी वसूल करत असले बाबत शिक्षण विभागा मार्फत चौकशी सुरु असतानाच ती संस्था आणखी एका वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. येथील संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये नुकतीच एका नवीन मुख्याध्यापिकेची नियुक्ती करण्यात आली. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे संबंधित मुख्याध्यापिकेने नुकताच इंग्रजी बोलणे शिकण्यासाठी इंग्लिश स्पीकिंगकोर्स दहिवडी मध्येच पूर्ण केला आहे आणि अजूनही त्या नीट इंग्रजी बोलू शकत नाहीत.या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आज इंग्रजी माध्यम शाळा ही गुणवत्तेचं प्रतीक मानली जाते. अशा शाळेत मुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापिका ही शाळेतील सर्वात महत्त्वाची शैक्षणिक व प्रशासकीय जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती असते. तिचं इंग्रजी भाषेतीलअपयश केवळ वैयक्तिक मर्यादा नसून एक शैक्षणिक अन्याय ठरतो. कारण शिक्षकांचे निरीक्षण, त्यांना मदत करणे आणि शिक्षणप्रक्रियेतील गुणवत्ता सुनिश्चित करणे हे मुख्याध्यापकाचे काम असते, इंग्रजी भाषेचे आकलन नसेल, तर इंग्रजी शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांचे मूल्यांकन कसे होणार? पालक हे इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेताना अपेक्षा ठेवतात की शाळा आधुनिक व गुणवत्तापूर्ण शिक्षणदेईल. प्रमुख व्यक्तीच इंग्रजीत आत्मविश्वासाने संवाद साधू शकत नसेल तर शाळेचा
विश्वास बिघडतो.
📢 पालकांची प्रतिक्रिया:
“आम्हीमोठ्या विश्वासाने आणि फी भरून आमच्या मुलांना इथे प्रवेश दिला. पण मुख्याध्यापिकेला स्वतःलाच इंग्रजी बोलता येत नसेल, तर आमच्या मुलांचं काय?”
– एका पालकाची प्रतिक्रिया
📍प्रशासनाकडे मागणी
या प्रकाराची सखोल चौकशी करून पात्र, सक्षम व अनुभवी शिक्षकांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे. शाळेतील प्रमुख पदावर असणाऱ्या व्यक्तीची भाषिक गुणवत्ता ही शाळेच्या दर्जाची पायाभूत गरज आहे. जर इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापकाला इंग्रजी नसेल, तर तो केवळ वैयक्तिक दोष नसून संपूर्ण शिक्षण प्रणालीतील भरकटलेपणाची लक्षणं आहेत. सुधारणा ही फक्त नोंदणी व मान्यतेपुरती न करता गुणवत्ता मूल्यमापनावर आधारित असली पाहिजे. आता मुख्य प्रश्न पडला आहे कि पालक, शिक्षक, व शाळा व्यवस्थापनसमितीची भूमिका काय असेल याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
Edited By: Lokprant

खबरें और भी हैं
कराड येथे 18 जुलै रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन
By Lokprant

Latest News
16 Jul 2025 10:16:20
पुणे: बदलत्या काळात नागरिकांची होणारी आर्थिक फसवणूक टाळण्याकरिता सायबर कक्षाची मदत घेवून कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र...