शिंगणापूर रस्त्यावरील खड्डे बुझविण्यात ठेकेदाराचा कामचुकारपणा

बांधकाम विभागाचे अभियंते मलिदा खाण्यात व्यस्त 

दहिवडी:  बांधकाम विभाग गेल्या काही वर्षापासून अर्धवट व चुकीची जीवघेणे कामे रस्त्यावर करत असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. महाराष्ट्रातील श्री शंभू महादेवाचे सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या शिखर शिंगणापूरला जाणाऱ्या दहिवडी शिंगणापूर रोडवर वावरहिरे हद्दीमधील रस्त्यावर पडलेले खड्डे मुजविण्याचे काम सुरू आहे. मात्र हे खड्डे निकृष्ट दर्जाचे भरलेले असून नियमानुसार मटेरियल न वापरता निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरले असल्यामुळे भरलेल्या खड्ड्यामधील खडी अवघ्या दोनच दिवसांमध्ये रस्त्यावर पसरली आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांना यातून मार्ग काढत असताना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. अनेक प्रवाशांच्या मोटरसायकल यातून घसरून पडले आहेत. मात्र दहिवडी बांधकाम विभाग हे खड्डे दुरुस्त करायचे सोडून हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बसले आहेत.

 बेफिकिर बांधकाम अधिकारी
        रस्त्यांची दयनीय अवस्था, मोठमोठे खड्डे, ठेकेदाराला अपूर्ण कामाची बिले काढायची गडबड, ठेकेदाराने केलेल्या कामाची पाहणी कधीच करायची नाही. आशा सर्व बाबीकडे दुर्लक्ष करून बेफिकीर असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची  जनतेतुन  मागणी होत  आहे.
        माण तालुक्यातील खेडे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेले खड्डे मुजविण्या ऐवजी त्यामध्ये माती आणि खडी पसरतात. त्यामुळे अनेकजण मोटारसायकली वरून घसरून पडले आहेत. अशी कामे करून ठेकेदार फसवणूक करत आहेत.त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अन्यथा आंदोलन करू असे वक्तव्य शिवसेना उबाठा गटाचे माण तालुका अध्यक्ष समीरबापू जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
 
माणमधील कामचुकार व जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या बांधकाम अधिकारी व ठेकेदार यांनी केलेल्या निकृष्ट कामाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अन्यथा आंदोलनाचा इशारा देणार अशी प्रतिक्रिया युसूफभाई शेख सातारा जिल्हाध्यक्ष रिपाई (आठवले गट )अल्प संख्यांक यांनी दिली आहे.
Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

बँकांनी आर्थिक साक्षरता मेळावे आयोजित करावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Latest News

बँकांनी आर्थिक साक्षरता मेळावे आयोजित करावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी बँकांनी आर्थिक साक्षरता मेळावे आयोजित करावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
पुणे: बदलत्या काळात नागरिकांची होणारी आर्थिक फसवणूक टाळण्याकरिता सायबर कक्षाची मदत घेवून कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र...
प्रशासकीय यंत्रणांद्वारे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती  अत्याचार प्रतिबंध अधिनियमाची  प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक - मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन
शिक्षणात गोंधळ!इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिकेलाच इंग्रजी येत नाही! पालक चिंतेत
शिंगणापूर रस्त्यावरील खड्डे बुझविण्यात ठेकेदाराचा कामचुकारपणा
लोकमान्य टिळकांचे पणतू, 'केसरी'चे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software