- Hindi News
- सातारा
- दहिवडीत १५ कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न
दहिवडीत १५ कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न
By Lokprant
On

दहिवडीच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी आणू :ना. जयकुमार गोरे
दहिवडी: दहिवडी ही माझ्या माण खटावची राजधानी आहे अन् ती राजधानीला शोभेल अशीच असली पाहिजे. दहिवडीचा जो अपेक्षित विकास व्हायला हवा होता तो झाला नाही हे माझं ठाम मत आहे. साडेतीन वर्षांचा बॅकलॉग दीड वर्षात भरुन काढू. आजपासून दहिवडीच्या विकासास खऱ्याअर्थाने सुरुवात झाली आहे. जिथं जयकुमार गोरे आहे तिथं पैशाची चिंता करायची नाही. लागेल तिथून पैसा आणू पण दहिवडीच्या विकासाला कमी पडणार नाही. या राजधानीला चांगलं स्वरुप देण्याचा संकल्प आपण करूया असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
दहिवडी शहरात १५ कोटी ६६ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूज रविवार १३ जुलै रोजी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित भव्य सत्कार समारंभ व जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी सोनिया गोरे, अॅड. भास्करराव गुंडगे, डॉ. संदीप पोळ, अरुण गोरे, बाळासाहेब सावंत, अतुल जाधव, अर्जुन काळे, अतुल शिंदे, दादासाहेब काळे, दिलीपराव जाधव, संजय गांधी, सिध्दार्थ गुंडगे, सतीश जाधव, साधना गुंडगे, सयाजी मोरे, शिवाजीराव शिंदे, गणेश सत्रे, प्रशांत गोरड, विशाल घोरपडे यांच्यासह नगराध्यक्ष नीलम जाधव, उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे, नगरसेवक सुरेखा पखाले, धनाजी जाधव, महेश जाधव, रुपेश मोरे व सर्व नगरसेवक उपस्थित होते.
मंत्री गोरे म्हणाले, निवडून आल्यानंतर मी या मातीचा आमदार आहे ही भूमिका घेऊन काम केलं. या तालुक्याचा बॅकलॉग भरून काढायचं काम केलं. प्रचंड दुष्काळी असणारा माण तालुका विकसित तालुका होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. माण तालुक्यातील जनतेच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सत्तर टक्के मार्गी लागलेला आहे. ऐन उन्हाळ्यात माणगंगा दुथडी भरून वाहिली.
दहिवडीतील शेतकऱ्यांची एक इंचही जमीन पाण्यापासून वंचित राहणार नाही. हे अधिवेशन संपल्या संपल्या शासन निर्णय निघेल अन् आमच्या पश्चिम भागातील पाण्याचा प्रश्न सुटेल. त्यामुळे यापुढे माझ्या माण खटावच्या मातीला दुष्काळी म्हणण्याची हिंमत कोणाची होणार नाही. लवकरच म्हसवड मध्ये औद्योगिक वसाहत विकसित होऊन कारखानदारी उभी राहिल, तरुणांच्या हाताला काम मिळेल.
नगराध्यक्षा नीलम जाधव म्हणाल्या, आपण सर्वजण मिळून दहिवडीच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण करु. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, अग्निशमन गाडी, भव्य स्मशान भूमी यासह शहराच्या विकासासाठी व सुशोभीकरणासाठी आवश्यक कामांसाठी भाऊंनी मदत करावी. यावेळी अॅड. भास्करराव गुंडगे यांनी मनोगत व्यक्त केले.
Edited By: Lokprant

खबरें और भी हैं
कराड येथे 18 जुलै रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन
By Lokprant

Latest News
16 Jul 2025 10:16:20
पुणे: बदलत्या काळात नागरिकांची होणारी आर्थिक फसवणूक टाळण्याकरिता सायबर कक्षाची मदत घेवून कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र...