कराड येथे 18 जुलै रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

सातारा:  जागतिक युवा कौशल्य सप्ताहानिमित्त सातारा जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांसाठी 18 जुलै रोजी  रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा व कृष्णाकाठ इन्स्टिट्यूट फॉर स्किल डेव्हलपमेंट अॅण्ड रिसर्च, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे याचा बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.

      या रोजगार मेळाव्यात कुशल/अर्धकुशल कामगार अशा सदर मेळाव्यात 10 वी, 12 वी, पदवीधर, आयटीआय सर्व ट्रेड, डिप्लोमा, इंजिनिअर अशा  प्रकारचे एक हजार पेक्षा जास्त रिक्तपदे http://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत. तरी नोकरी इच्छुक उमेदवारांनी 18 जुलै रोजी  कृष्णाकाठ इन्स्टिट्यूट फॉर स्किल डेव्हलपमेंट अॅण्ड रिसर्च, मंगळवार पेठ, कराड नगरपरिषदेजवळ कराड  येथे आपली शैक्षणिक कागदपत्रे घेऊन प्रत्यक्ष उपस्थित राहावे. मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाच्या ०२१६२-२३९९३८ या दुरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

बँकांनी आर्थिक साक्षरता मेळावे आयोजित करावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Latest News

बँकांनी आर्थिक साक्षरता मेळावे आयोजित करावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी बँकांनी आर्थिक साक्षरता मेळावे आयोजित करावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
पुणे: बदलत्या काळात नागरिकांची होणारी आर्थिक फसवणूक टाळण्याकरिता सायबर कक्षाची मदत घेवून कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र...
प्रशासकीय यंत्रणांद्वारे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती  अत्याचार प्रतिबंध अधिनियमाची  प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक - मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन
शिक्षणात गोंधळ!इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिकेलाच इंग्रजी येत नाही! पालक चिंतेत
शिंगणापूर रस्त्यावरील खड्डे बुझविण्यात ठेकेदाराचा कामचुकारपणा
लोकमान्य टिळकांचे पणतू, 'केसरी'चे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software