उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला उत्तराखंड येथील पर्यटकांशी संवाद

सातारा: उत्तराखंड जिल्हा उत्तरकाशी येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील पर्यटक अडकेले आहेत. या अडलेल्या पर्यटकांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधून त्यांना धीर दिला.उत्तराखंड जिल्हा उत्तरकाशी येथे  दि. ३० जून रोजी सिलाईबंद या ठिकाणी अतिवृष्टिमुळे चारधाम रस्ता वाहून गेला असल्याने महाराष्ट्रातील सर्वसाधारणपणे 150 पर्यटक अडकले होते. झांझवड ता. महाबळेश्वर येथील 6 पर्यटकांचा यामध्ये समावेश होता. ते सध्या बडकोट येथे सुखरुप असल्याची माहिती समोर आली आहे.

      यावेळी  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झांझवड ता. महाबळेश्वर येथील पर्यटक आकाश जाधव यांच्याशीही भ्रमणध्वनीवरुन संवाद साधला. तेथील परिस्थिती बद्दल माहिती घेतली. प्रशासनाने केलेल्या मदतीबद्दल जाणून घेतले. काही अडचण असल्यास त्वरीत संपर्क साधण्याबाबत सांगितले. महाराष्ट्रतील पर्यटकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री यांच्याशीही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संवाद साधला. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रात अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षीत महाराष्ट्रात पाठविले जाईल, असे सांगितले. उत्तराखंड येथील स्थानिक प्रशासन सहकार्य करीत असून महाराष्ट्रातील पर्यटकांना सुरक्षीत ठिकाणी हलविण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री  शिंदे यांनी दिल्या.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

महंत शांतिगिरीजी महाराजांच्या आशीर्वादासाठी हजारोंचा जनसागर; गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मलवडीत कार्यक्रमाचे आयोजन

Latest News

महंत शांतिगिरीजी महाराजांच्या आशीर्वादासाठी हजारोंचा जनसागर; गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मलवडीत कार्यक्रमाचे आयोजन महंत शांतिगिरीजी महाराजांच्या आशीर्वादासाठी हजारोंचा जनसागर; गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मलवडीत कार्यक्रमाचे आयोजन
  मलवडी (ता. माण )येथे श्री शांतिगिरीजी महाराज आश्रम या ठिकाणी, गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात पार पडला. हजारो
ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी मध्ये पालखी सोहळा थाटामाटात संपन्न
पिंगळी बुद्रुक सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी मनीषा फडतरे
सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग विभागाचे  भारताच्या सकल उत्पन्नात महत्वपूर्ण योगदान - केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी
विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत' योजनेद्वारे  ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला लाभ - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software