कृत्रिम फुलांवर बंदीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणार - फलोत्पादन मंत्री भरत गोगावले

मुंबई: राज्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कृत्रिम फुलावर बंदी घालण्यासंदर्भात पर्यावरण मंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल,असे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य महेश शिंदे यांनी  कृत्रिम फुलांच्या अतिरिक्त वापरामुळे सर्व प्रकारच्या फुलांची बाजारपेठ अडचणीत आली असून  फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली.

      फलोत्पादन मंत्री भरत गोगावले म्हणाले फ़ुलशेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान, काढणीपश्चात प्रशिक्षण, हरितगृहातील आधुनिक तंत्रज्ञान यासंदर्भात  फुल उत्पादक शेतकऱ्यांना बाजारातील स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. मात्र बाजारात कृत्रिम फुले येत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत लोकप्रतिनिधी यांच्यासह पर्यावरण विभागासोबत अधिवेशनकाळातच   बैठक घेऊन यावर नियंत्रणासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असेही  गोगावले यांनी यावेळी सांगितले. सदस्य कैलास पाटील(घाडगे), नारायण कुचे यांनी या लक्षवेधीमध्ये सहभाग घेतला.

Edited By: Lokprant

खबरें और भी हैं

पुण्यात डॉक्टरच करत होता ड्रग्सची तस्करी...तब्बल 15 लाखांचे मेफेड्रोन केले जप्त

Latest News

पुण्यात डॉक्टरच करत होता ड्रग्सची तस्करी...तब्बल 15 लाखांचे मेफेड्रोन केले जप्त पुण्यात डॉक्टरच करत होता ड्रग्सची तस्करी...तब्बल 15 लाखांचे मेफेड्रोन केले जप्त
      पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे त्यातच पुण्यातील बिबवेवाडी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात
ग्रामविकास मंत्र्यांच्या तालुक्यातच बांधकाम विभागाचा सावळा गोंधळ; कुळकजाई घाटात साईटपट्ट्या न भरल्यामुळे घाट बनला मृत्यूचा सापळा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयात पहिली अत्याधुनिक कृत्रिम सांधरोपण शस्त्रक्रिया यशस्वी
बँकांनी आर्थिक साक्षरता मेळावे आयोजित करावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
प्रशासकीय यंत्रणांद्वारे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती  अत्याचार प्रतिबंध अधिनियमाची  प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक - मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software