- Hindi News
- सातारा
- ग्रामविकास मंत्र्यांच्या तालुक्यातच बांधकाम विभागाचा सावळा गोंधळ; कुळकजाई घाटात साईटपट्ट्या न भरल्य...
ग्रामविकास मंत्र्यांच्या तालुक्यातच बांधकाम विभागाचा सावळा गोंधळ; कुळकजाई घाटात साईटपट्ट्या न भरल्यामुळे घाट बनला मृत्यूचा सापळा
By Lokprant
On

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माण तालुक्यातील आणि आंधळी जिल्हा परिषद गटातील कुळकजाई घाटामध्ये गेल्या अनेक दिवसापासून रस्त्याच्या साईड पट्ट्या न भरल्यामुळे सदर घाट मृत्यूचा सापळा बनला आहे. दहिवडी सार्वजनिक बांधकाम विभागाला निकृष्ट कामाचे लागलेले ग्रहण हे शाखा अभियंता यांच्यामुळे लागले असलेची चर्चा आहे. कुळक जाई घाट हा दहिवडी आणि खटाव तालुक्याला जोडणारा आहे. या घाटातील रस्ता खूपच अरुंद आहे. त्यामध्ये येथील शाखा अभियंता आणि ठेकेदार या रस्त्याची दुरुस्ती करत नाहीत. खड्डे देखील भरत नाहीत आणि साईड पट्ट्या देखील भरत नाहीत. त्यामुळे या घाटातून प्रवास करताना जीव मुठीत धरावा लागत आहे.
ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या आंधळी गटातील कुळकजाई घाट हा त्यांच्या निवासस्थानापासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर आहे. तरीदेखील दहिवडी बांधकाम विभाग या रस्त्याचे काम न करता बिले काढण्यामध्ये व्यस्त आहेत. अशा मुजोर अधिकारी व ठेकेदार यांना जयकुमार गोरे यांनी वटणीवर आणावे अशी ग्रामस्थांमधून मागणी होत आहे.
शाखा अभियंता रियाज सय्यद खातोय मलिदा
मलवडी परिसरातील शाखा अभियंता रियाज सय्यद याच्या आशीर्वादामुळे या परिसरातील रस्ते निकृष्ट दर्जाचे बनले आहेत. ठेकेदाराला पाठीशी घालत न केलेल्या कामाची बिले काढले जात आहेत अशी चर्चा या परिसरामध्ये आहे.
कुळकजाई घाटामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर साईड पट्टी खचली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे आहेत. अनेक प्रवासी मोटरसायकल वरून या खड्ड्यात पडलेल्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे येथील ठेकेदार याची चौकशी करून त्यांना काळी यादीमध्ये टाकण्यात यावे व शाखा अभियंता रियाज सय्यद यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी प्रतिक्रिया युसूफ शेख
रिपाई अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सातारा यांनी दिली आहे.
Edited By: Lokprant


Latest News
17 Jul 2025 16:20:32
दहिवडी: बिदाल मधील श्री संत सावतामाळी नगर तरुण मंडळाच्या वतीने श्री संत सावतामाळी संजीवन समाधी सोहळ्या निमित्त सोमवार (दि.२१ )...